AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budhwar Upay : जीवनात पाहिजे असेल प्रत्त्येक क्षेत्रात यश, तर बुधवारी संध्याकाळी करा हे विशेष उपाय

बुधवारी उपवास ठेवण्याबरोबरच विधीनुसार गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करतो त्याचे बाप्पा सर्व संकट दूर करतात.

Budhwar Upay : जीवनात पाहिजे असेल प्रत्त्येक क्षेत्रात यश, तर बुधवारी संध्याकाळी करा हे विशेष उपाय
गणपतीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Apr 06, 2023 | 1:40 PM
Share

मुंबई : बुधवारी गणपतीची पूजा केली जाते. कोणत्याही पूजेत आणि शुभ कार्यात गणेशजींचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की गणेशाशिवाय कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणून प्रथम त्यांची पूजा केली जाते. बुधवारी उपवास ठेवण्याबरोबरच विधीनुसार गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवशी गणपतीची आराधना करतो त्याचे बाप्पा सर्व संकट दूर करतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. याशिवाय बुधवारी संध्याकाळी (Budhwar Upay) काही ज्योतिषीय उपाय केल्यास व्यवसायापासून नोकरीपर्यंत भरपूर यश मिळते. एवढेच नाही तर संपत्तीही वाढते. जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय करणे शुभ आहे.

बुधवारचे उपाय

1- बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गूळ अर्पण करा. असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते, यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही.

2- या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी 21 दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. असे केल्याने गणेश लवकर प्रसन्न होतो.

3- बुधवारी गायीला हिरवे गवत खायला द्यावे. यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल.

4- बुधवारी माता दुर्गेची पूजा करा. याशिवाय ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ या मंत्राचा नियमित 108 वेळा जप करा, बुध दोषापासून मुक्ती मिळेल.

५- या दिवशी श्रीगणेशाच्या डोक्यावर सिंदूर लावा, त्यानंतर कपाळावर लावा. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

6- बुधवारी करंगळीवर पाचू घाला. असे केल्याने कुंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते. परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या.

7- बुधवारी ‘ओम गं गणपतये नमः’ किंवा ‘श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा जप करा, यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.

8- जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर आज हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?