Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, देवी शैलपुत्रीची पूजा कशी करावी?

| Updated on: Apr 13, 2021 | 12:42 PM

आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गाचं पहिलं स्वरुप (Chaitra Navratri 2021) शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते.

Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, देवी शैलपुत्रीची पूजा कशी करावी?
Mata Shailputri
Follow us on

मुंबई : आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी देवी दुर्गाचं पहिलं स्वरुप (Chaitra Navratri 2021) शैलपुत्री रुपाची पूजा केली जाते. नवरात्रीदरम्यान नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लोक घरात घट स्थापना म्हणजेच कलश स्थापना करतात. यावेळी नवरात्री 13 एप्रिलला आहे आणि 22 एप्रिलला 2021 संपेल (Chaitra Navratri 2021 First Day How To Worship Mata Shailputri).

देवी शैलपुत्री यांना देवी पार्वतीचं आणखी एक स्वरुप मानलं जातं. माहितीनुसार, देवी शैलपुत्रीचे चार हात असतात आणि त्या नंदीवर (बैल) सवार असतात. त्या पार्वती, हेमवती, सती, भवानी इत्यादी नावानेही ओळखलं जातं. शैलपुत्री शब्दाचा अर्थ पहाडांची कन्या आहे.

देवी शैलपुत्रीची पूजा विधी

सकाळी स्नान करावं आणि या दिवशी देवी शैलपुत्रीच्या मूर्तीची पूजा करावी. लोकांना देवी शैलपुत्रीच्या मंत्रांचाही जप करावा आणि अखेर देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीची आरती करावी.

या दिवशी या मंत्राचा जप करावा –

या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

ओम देवी शैलपुत्रायै नमः

सर्वस्वरूपे सर्वेशे, सर्व शक्ति समन्विते
भये भ्यास्त्राहि नो देवि, दुर्गे देवी नमोस्तुते

एतत् वदं सौमं लोचनं त्राहुशीतम्
पातु नः सर्वभूताभिः कात्यायनी नमोस्तुते
ज्वाला करला मत्युग्रामम् शेषासुर सुदणम्
त्रिशुलम पातु न भितर भद्रकाली नमोस्तुते

देवी शैलपुत्रीचा इतिहास –

हिंदू पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीचा जन्म त्यांच्या पूर्व जन्मातील देवी सतीच्या रुपात झाला आणि त्यांनी पिता दक्ष प्रजापतीमुळे स्वत:ला निहाल करुन मृत्यूला त्यांनी कवटाळलं. एक दिवशी सतीच्या पितांनी सर्वांना एक भव्य यज्ञात आमंत्रित केलं पण त्यांनी भगवान शिवला फक्त त्यांचा अपमान करण्यासाठी आमंत्रण दिलं नाही. त्यामुळे देवी सतीने त्याच यज्ञात स्वत:ला भस्म केलं.

त्यानंतर त्यांनी पर्वत राजाची मुलगी पार्वती म्हणून जन्म घेतला आणि त्यांनी ध्यान केलं आणि प्रार्थना केली जेणेकरुन त्या भगवान शिवसोबत विवाह करु शकतील. ध्याननंतर, एक दिवस भगवान ब्रह्मा त्यांच्यापुढे प्रकट झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला की भगवान शिव त्यांच्याशी विवाह करतील.

Chaitra Navratri 2021 First Day How To Worship Mata Shailputri

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Shree Krishna | जेव्हा एका भक्तासाठी खुद्द भगवान श्रीकृष्ण साक्ष द्यायला आले! जाणून घ्या ही पौराणिक कथा…

Chaitra Navratri 2021 | नवरात्रीदरम्यान चुकूनही ‘या’ गोष्टी करु नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं…