Chaitra Navratri 2021 | नवरात्रीदरम्यान चुकूनही ‘या’ गोष्टी करु नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं…

नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे (Chaitra Navratri 2021). यावेळी चैत्र नवरात्री 13 एप्रिल पासून सुरु होत आहे आणि 21 एप्रिलला संपेल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:39 PM, 8 Apr 2021
Chaitra Navratri 2021 | नवरात्रीदरम्यान चुकूनही 'या' गोष्टी करु नये, अन्यथा नुकसान होऊ शकतं...
Chaitra Navratri

मुंबई : नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे (Chaitra Navratri 2021). यावेळी चैत्र नवरात्री 13 एप्रिल पासून सुरु होत आहे आणि 21 एप्रिलला संपेल. हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. वर्षभरात एकूण चार नवरात्र येतात. यापैकी दोन गुप्त नवरात्र असतात ज्या आषाढ आणि माघ महिन्यात येतात. तर इतर दोन शारदीय आणि चैत्र महिन्यात साजरी केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते (Chaitra Navratri 2021 Do Not Do These Things During Navratri ).

अनेकजण नवरात्रीदरम्यान नऊ दिवसांचा उपवास देखील ठेवतात आणि देवीच्या नऊ स्वरुपांची पूजा करतात. या नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्या भाविकांना काही नियम पाळणे गरजेचं असते. चला जाणून घेऊया या नियमांबाबत –

1. नवरात्रीदरम्यान उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने लसून, कांदा आणि मांस यांचं सेवन करु नये. जर तुमच्या घरात कलश स्थापना, अखंड ज्योती असते किंवा देवीचं जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामं सोडू नये. नेहमी घरात कोणी ना कोणी असावं.

2. उपवास ठेवणाऱ्यांनी नवरात्रीदरम्यान दाढी, केस आणि नखं कापू नये.

3. काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा-अर्चना करु नये. त्याऐवजी लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे घाला.

4. उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल, बूट आणि बेल्टचा वापरही करु नये.

5. या दरम्यान ब्रह्मचर्यचं पालन करावं.

6. विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री दरम्यान दिवसा झोपू नये.

7. नवरात्रीत उपवास ठेवणाऱ्या लोकांनी फळ खावी. यादरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मीठाचं सेवन करु नये. तुम्ही उपवास सोडण्यासाठी शिंगाड्याचं पीठ, सेंधा मीठ, बटाटा, मेवा, शेंगदाने यांचे सेवन करु शकता.

8. उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचं पठन करताना कुणाशी बालू नये. असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते.

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त

घट स्थापनेचा शुभ मुहूर्त 13 एप्रिल 2021 ला मंगळवारी सकाली 5 वाजून 28 मिनिटांपासून ते 19 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल.

दुसरा शुभ मुहूर्त – 11 वाजून 56 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 47 मिनिटांपर्यंत असेल.

नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापित केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर रहाते आणि तुम्हाला शुभ फळ मिळतात.

Chaitra Navratri 2021 Do Not Do These Things During Navratri

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | कधीपासून सुरु होतेय ‘चैत्र नवरात्री’, जाणून घ्या कुठल्या दिवशी दुर्गा देवीच्या कुठल्या स्वरुपाची पूजा होणार….