Chaitra Navratri 2021 : देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, घरात सुख-समृद्धी नांदेल….

| Updated on: Apr 14, 2021 | 12:33 PM

हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे (Chaitra Navratri 2021). 13 एप्रिलपासून ते 21 एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्री साजरी केली जाईल.

Chaitra Navratri 2021 : देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा, घरात सुख-समृद्धी नांदेल....
devi-durga
Follow us on

मुंबई : हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे (Chaitra Navratri 2021). 13 एप्रिलपासून ते 21 एप्रिलपर्यंत चैत्र नवरात्री साजरी केली जाईल. या नऊ दिवसांपर्यंत देवी दुर्गाचे नऊ स्वरुपांची पूजा अर्चना केली जाते. या नऊ दिवसांपर्यंत भक्त देवी दुर्गाचे भक्ती-भावात मग्न होतात. काही लोक यादरम्यान व्रत ठेवतात (Chaitra Navratri 2021 Know How To Please Goddess Durga).

देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. या दिवसांमध्ये पूजा-अर्चना केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात.

हिंदू धर्मात मान्यता आहे की या नऊ दिवसांत देवी दुर्गा धरती लोकवर येते . या दिवसांमध्ये पूजा-अर्चना केल्याने देवी तुमच्या सर्व मनोकानमा पूर्ण करतात. त्याशिवाय, आयुष्यातील समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी ज्योतिशास्त्रात नवरात्रीदरम्यान काय उपाय करावे याबाबत माहिती देण्यात आली आहे –

तुळशीचं रोप लावा

1. नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुळशीचं रोप लावमे अत्यंत शुभ मानलं जाते. जर घरात तुळशीचं रोप असेल तर एक नाणं घेऊन लेकर अपनी नवस मागा आणि तुळशीच्या मातीत टाका. असं केल्याने तुम्हाला यश मिळेल.

2. देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाटी चंडी पाठ किंवा दुर्गा सप्तशतीचं पठन करणेही अत्यंत शुभ मानलं जातं. या पाठाला नियमानुसार केल्याने देवी प्रसन्न होते.

3. जीवनात समस्या असतील तर देवी दुर्गाच्या बीज मंत्र “ऊं ह्रीं दुं दुर्गायै नम:”चा 108 वेळा जप केला. त्याशिवाय, भगवान शिववर दही अर्पण करा. यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात.

4. देवीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे पूजा करताना लाल रंगाचे कपडे परिधान करा आणि देवीला लाल रंगाचे फूल अर्पण करा. असं केल्याने देवी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

5. देवीची पूजा-अर्चना केल्यानंतर प्रसाद म्हणून गायीचं दूध आणि मधापासून तयार केलेले पदार्थ दाखवावे. त्याशिवाय, घरात धूप-दिवा लावावा. असं केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात.

Chaitra Navratri 2021 Know How To Please Goddess Durga

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस, देवी शैलपुत्रीची पूजा कशी करावी?

Chaitra Navratri 2021 | 13 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात, त्यापूर्वी ही कामं आटपून घ्या, देवी प्रसन्न होईल…