Chaitra Navratri : शत्रूपासून रक्षण करते देवी कुष्मांडा, शक्ती आणि आरोग्यासाठी अशा प्रकारे करा आराधना

| Updated on: Mar 25, 2023 | 11:02 AM

या देवीच्या उपासनेने भक्ताला शक्ती आणि आरोग्य प्राप्त होते, असेही मानले जाते. जो देवीची भक्ती भावाने पूजा करतो त्याला उच्च पद सहज प्राप्त होते. देवी रोगांपासून मुक्ती देऊन सुख-समृद्धी देते.

Chaitra Navratri : शत्रूपासून रक्षण करते देवी कुष्मांडा, शक्ती आणि आरोग्यासाठी अशा प्रकारे करा आराधना
देवी कुष्मांडा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : शक्तीच्या उपासनेचा उत्सव असलेल्या नवरात्रीच्या (Chaitra Navratri 2023) चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपात पूजा केली जाते. देवी कुष्मांडा (Krushmanda) हे आदिशक्तीचे चौथे रूप आहे. विश्वाच्या निर्मितीपूर्वी जेव्हा चहूबाजूंनी अंधार होता आणि सृष्टी पूर्णपणे शून्य होती, तेव्हा आदिशक्ती  दुर्गानी या विश्वाची निर्मिती केली. म्हणूनच देवीच्या चौथ्या रूपाला कुष्मांडा असे म्हटले गेले. अशी माहिती भागवत पुराणात मिळते. कुष्मांडा देवी या विश्वाची निर्माती असल्यामुळे तिला आदिशक्ती या नावाने देखील ओळखले जाते. या देवीच्या उपासनेने भक्ताला शक्ती आणि आरोग्य प्राप्त होते, असेही मानले जाते.  या देवीची आराधना केल्याने भक्ताला रोग आणि दुःखाचे भय राहत नाही आणि दीर्घायुष्य, कीर्ती, बल आणि आरोग्य प्राप्त होते. जो देवीची भक्ती भावाने पूजा करतो त्याला उच्च पद सहज प्राप्त होते. देवी रोगांपासून मुक्ती देऊन सुख-समृद्धी देते.

देवीचे नाव समजून घ्या

‘कु’ म्हणजे लहान, ‘श’ म्हणजे ऊर्जा आणि ‘अंडा’ म्हणजे वैश्विक गोल. आपल्या सर्वांना माहित आहे की संपूर्ण विश्वात ऊर्जेचा संचार सूक्ष्म ते स्थूलापर्यंत म्हणजेच लहान ते मोठ्यापर्यंत होतो. एक बी देखील खूप लहान असते आणि नंतर ते फळ बनते आणि त्या फळापासून नवीन बिया जन्माला येतात. त्याचप्रमाणे चेतना किंवा उर्जेमध्ये सूक्ष्म ते विशाल असा गुण आहे, जो देवी कुष्मांडा या नावात स्पष्ट होतो. याचा अर्थ देवी माता आपल्या शरीरात प्राणशक्तीच्या रूपात विराजमान आहे.

देवीचे वर्णन

कुष्मांडा हिला आठ भुजां असल्यामुळे तिला आठ भुजाही म्हणतात. त्यांच्या सात हातात अनुक्रमे कमंडल धनुष्य बाण, कमळ, कलश आणि अमृताने भरलेली गदा दिसते, तर आठव्या हातात जपमाळ आहे.

हे सुद्धा वाचा

अशी पुजा करा

दुर्गापूजेच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची मनोभावे पूजा करावी. सर्व प्रथम पहिल्या दिवशी कलशात बसलेल्या देवतांची पूजा करा. त्यानंतर कुष्मांडाची पुजा करावी. हातात फुले घेऊन मातेची पूजा करून देवीच्या मंत्राचे ध्यान करावे.

पुजेचे महत्त्व

कुष्मांडा मातेच्या उपासनेचे खूप महत्त्व आहे. देवी कुष्मांडा देवी रोग आणि दुःख दूर करून आरोग्याचा आशीर्वाद देते.मातेच्या पुजेने जीवन मिळते.वैवाहिक , कीर्ती आणि सामर्थ्य मिळते अशी मान्यता आहे. देवी कुष्मांडा मातेच्या उपासनेने सर्व प्रकारचे संकट दूर होतात असे विधान आपल्या पुराणांमध्ये आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)