Chaitra Navratri 2023 : या तारखेला आहे दुर्गाष्टमी आणि कन्या पूजन, असा आहे शुभ मुहूर्त

यावर्षी रामनवमी 30 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र शुक्ल नवमी तिथी 30 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता असेल. महानवमीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.

Chaitra Navratri 2023 : या तारखेला आहे दुर्गाष्टमी आणि कन्या पूजन, असा आहे शुभ मुहूर्त
दुर्गाष्टमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 9:57 AM

मुंबई : हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र नवरात्रीच्या (Chaitra Navratri 2023) पहिल्या दिवशी होते. अशाप्रकारे चैत्र महिन्यातील नवरात्र ही हिंदू वर्षातील पहिली नवरात्र आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये  दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अष्टमी तिथीला महाअष्टमी साजरी केली जाते आणि माता दुर्गेची विशेष पूजा केली जाते. दुसरीकडे, राम नवमी (Ram Navami 2023) शेवटच्या दिवशी साजरी केली जाते कारण भगवान रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी तिथीला झाला होता. या नऊ दिवसात माता अंबेची पूजा करणे खूप लाभदायक आहे कारण नवरात्रीचे  दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात.

 कधी आहे दुर्गाष्टमी

हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी चैत्र नवरात्रीची दुर्गा अष्टमी बुधवार, 29 मार्च रोजी आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 29 मार्च रोजी रात्री 9.07 पर्यंत असेल. या दिवशी माता दुर्गेचा आठवा अवतार महागौरीची पूजा केली जाते. काही लोकं या दिवशी हवन-पूजन आणि कन्यापूजन करतात. यावेळी दुर्गा अष्टमीच्या दिवशी रवियोग आणि शोभन योग तयार होत असल्याने या वेळी केलेल्या उपासना उपायांनी भरपूर लाभ मिळेल.

 कधी आहे राम नवमी

यावर्षी रामनवमी 30 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. चैत्र शुक्ल नवमी तिथी 30 मार्च रोजी रात्री 11.30 वाजता असेल. महानवमीला माता सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. यासोबतच देशभरात भगवान रामाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महानवमीच्या दिवशी चार शुभ योग – सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, गुरु पुष्य योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहेत. हे शुभ योग ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले गेले आहेत. यामध्ये केलेली पूजा-पाठ किंवा कार्य खूप शुभ फळ देते. यासोबतच या दिवशी हवन आणि कन्यापूजन करणे शुभ राहील.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.