Chanakya Neeti : न लढताही शत्रूला असं पराभूत करा, चाणक्य यांनी काय सांगितलंय?

तुम्ही देखील अशा काही व्यक्तींपासून परेशान आहात का? जो व्यक्ती कायम तुमच्याविरोधात कट कारस्थान रचतो. तुमची चूक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही? मग अशा व्यक्तीचा सामना कसा करायचा? याबाबत चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Neeti :  न लढताही शत्रूला असं पराभूत करा, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 9:42 PM

तुम्ही देखील अशा काही व्यक्तींपासून परेशान आहात का? जो व्यक्ती कायम तुमच्याविरोधात कट कारस्थान रचतो. तुमची चूक दाखवण्याची एकही संधी सोडत नाही? मात्र तुम्हाला या व्यक्तीचा थेट सामना करायचा नाहीये किंवा त्यांच्यासोबत वाद देखील घालायाचा नाहीये, मग अशा परिस्थितीमध्ये आर्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या काही खास नीती तुमच्यासाठी उपयोगाच्या ठरू शकतील, त्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

शांततेला आपली शक्ती बनवा – चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवतो, तो युद्ध न करताही विजय मिळू शकतो. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला कोणतंही उत्तर देत नाहीत, तेव्हा तुम्ही त्यांच्या योजनेला पूर्णपणे फेल करतात. तुमचं शांत राहणं तुमच्या शत्रूचा आत्मविश्वास तोडतो, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शांत राहा, असा सल्ला चाणक्य देतात.

शांतीत क्राती करा – चाणक्य म्हणतात तुम्ही शांततेत प्रगती करत रहा, तुम्ही किती यशस्वी झाला आहात, किंवा किती यश मिळालं आहे, याची चर्चा करू नका, जेव्हा तुम्ही शांततेत यश मिळवता, ते यश तुमच्या शत्रूच्या तोंडात एक मोठी चपराक असते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, तुमचं यश पाहून त्याचा पराभव होतो, असं चाणक्य म्हणतात.

लक्ष देऊ नका – चाणक्य म्हणतात तुम्ही अशा लोकांकडे लक्ष देऊ नका, त्यांना जाणीवपूर्वक टाळा, अशा लोकांना जाणीवपूर्वक टाळणं, त्यांच्याकडे लक्ष न देणं हीच त्यांची मोठी शिक्षा असते, त्यानंतर एक दिवस असा येतो की हे लोक तुम्हाला त्रास देणं थांबवतात.

त्याची चाल ओळखा – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या शत्रूची चाल ओळखा आणि तो जो चाल चालणार आहे, त्यापूर्वीच तुम्ही त्याच्या पुढची चाल खेळा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहायला शिका, असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)