
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या समाजाला आजही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी उत्तम राजा कसा असावा? आणि राज्यकारभार कसा चालला पाहिजे? याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र त्याचसोबत त्यांनी मानवाला आपलं आयुष्य जगताना उपयोगी पडतील असे विचार देखील आपल्या या ग्रंथामध्ये मांडले आहेत.
चाणक्य म्हणतात अनेकदा माणसाच्या पुढे अशी परिस्थिती निर्माण होते, त्या परिस्थितीमध्ये आपलं कोण आणि परकं कोण? हे त्याला समजत नाही, त्यामुळे तो अनेकदा चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो, त्यामुळे त्याचं मोठं नुकसान होतं. मात्र आयुष्यात माणसाला आपलं कोण आणि परकं कोण? यातील फरक हा ओळखताच आला पाहिजे, तर त्याची फसवणूक होणार नाही. माणसाने नहेमी आयुष्यात दोन व्यक्तींपासून सावध राहिले पाहिजे, असं चाणक्य म्हणतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यानी नेमकं काय म्हटलं आहे?
चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे दोन लोक असतातच, ज्यांच्यामुळे तुमंच भविष्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांची साथ तुमच्या हातात वेळ असतानाच सोडली पाहिजे, अन्यथा तुम्ही जर त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते.
कपटी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसानं मित्र बनवले पाहिजेत, कारण जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा तुमचे खरे मित्रच तुमच्या कामाला येतात, ते तुम्हाला या संकटातून बाहेर काढतात. मात्र तुम्हाला मित्रांमधील फरक ओळखता आला पाहिजे. जे मित्र तुमचा वारंवार विश्वासघात करतात, अशा मित्रांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, त्यांची संगत सोडली पाहिजे, त्यातचं तुमचं हीत आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
गरज असताना मदत न करणारे नातेवाईक – चाणक्य म्हणतात जे आपल्या गरजेच्या वेळी मदतीसाठी धावून येतात, तेच खरे आपले हितचिंतक असतात. त्यामुळे जे नातेवाईक तुम्हाला गरज असताना, तुमच्यावर संकट असताना देखील तुम्हाला मदत करत नाहीत, तर अशा नातेवाईकांपासून सावध रहा, ते फक्त तुमचा गरजेपुरता वापर करतात, त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहण्यातच फायदा आहे, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)