
मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) हे भारतीय इतिहासातील एक महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते, त्यांनी जीवन जगण्यासाठी अनेक नैतिक तत्त्वे दिली. व्यक्ती, कुटुंब, संस्था, समाज इत्यादींनी कसे वागावे आणि या सर्वांची कर्तव्ये व अधिकार काय आहेत याचा तपशीलवार उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी विवाह विधी समाजाच्या सुयोग्य निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे वर्णन केले होते. तसेच लग्न करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? वैवाहिक नात्यात अडकण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रीमध्ये कोणते गुण असावेत याचा तपशीलवार उल्लेख केला आहे. यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे दोघांमध्ये असलेले वयाचे अंतर.
आचार्य चाणक्य यांनी स्त्री-पुरुषांच्या वैवाहिक जीवनातील चिंता दूर करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी लग्न हे एक आदर्श सामाजिक-धार्मिक नाते असल्याचे म्हटले आहे. विवाह हा देखील एक आध्यात्मिक अनुभव आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की, यशस्वी विवाह म्हणजे ज्यामध्ये पती-पत्नी एकमेकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संतुष्ट करतात.
आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, वैवाहिक संबंधांमध्ये हे लक्षात ठेवले पाहिजे की पती-पत्नीच्या वयात जास्त अंतर नसावे. शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषच आपल्या पत्नीच्या शारीरिक इच्छा पूर्ण करू शकतो. अशा परिस्थितीत नवरा म्हातारा असेल तर तो पत्नीला मानसिक आणि शारीरिक सुख देऊ शकत नाही. आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की जर पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकते आणि त्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)