Chanakya Niti : दृष्ट व्यक्तींवर विश्वास ठेवू नका अन् मूर्ख लोकांना…, आयुष्य बदलून टाकणारे चाणक्य यांचे पाच विचार

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना प्रेरणा देतात. आज आपण चाणक्य यांचे असेच काही विचार जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : दृष्ट व्यक्तींवर विश्वास ठेवू नका अन् मूर्ख लोकांना..., आयुष्य बदलून टाकणारे चाणक्य  यांचे पाच विचार
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 05, 2026 | 9:29 PM

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? काय करावं आणि काय करू नये? पुरुषांची कर्तव्य काय आहेत? स्त्रीयांची कर्तव्य काय आहेत? विद्यार्थी जीवनात माणसाने कसं असावं? कुटुंबप्रमुखाची जबाबदारी काय असते? संसार कसा करावा? शत्रूंचा सामना कसा करावा? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. आयुष्य बदलण्याची ताकद त्यांच्या विचारांमध्ये दिसून येते. आज आपण चाणक्य यांचे पाच असे विचार जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात यशाचा मार्ग अधिक सुखकर होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

दृष्ट लोकांवर विश्वास ठेवू नका – आर्य चाणक्य म्हणतात आयुष्यात कधीही दृष्ट लोकांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे, हे लोक असे असतात की तुम्ही यांना कितीही जीव लावा, आपलंस करण्याचा प्रयत्न करा. परंतु वेळ आली की हे लोक तुम्हाला डंख मारणारच, ते तुमचा विश्वासघात करणारचं, त्यामुळे अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका.

मूर्ख लोकांपासून दूर रहा – चाणक्य म्हणतात जे लोक मूर्ख असतात, अशा लोकांपासून तुम्ही योग्य ते अतंर ठेवूनच वागलं पाहिजे. अशा लोकांशी केलेली जवळीक तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

संयम – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला या जगात यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे संयम नावाची गोष्ट हवीच. अनेकजण एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं की ती गोष्ट करणं लगेच सोडून देतात. परंतु अपयशाने खचून जाऊ नका, तर संयम ठेवा. अपयशातून धडा घ्या. पुढच्यावेळी तुम्हाला त्यामध्ये नक्की यश मिळेल.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला कष्टच करावे लागतात. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कधीही आळस करू नका. तुमच्या जबाबदाऱ्या या वेळेतच पूर्ण करा. एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

ज्ञान- चाणक्य म्हणतात माणूस नेहमी ज्ञानाचा भुकेला असला पाहिजे, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं पूर्ण ज्ञान असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. त्यामुळे जिथून ज्ञान भेटतं आहे, तिथून ते माणसने घ्यावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us