जेव्हा सर्व काही गमावल्यासारखे वाटते, तेव्हा काय करायचे? आचार्य चाणाक्य म्हणतात…
जीवनात अशी एक वेळ येते जेव्हा आपल्याला सर्वकाही गमावल्या सारखे वाटते. अशा परिस्थितीत देखील आपल्याला मार्ग कढता आला पाहिजे. अशा परिस्थितीत काय करायचं... यावर आचार्य चाणाक्य यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

आचार्य चाणाक्य यांनी त्यांच्या चाणात्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचा उपयोग आपल्याला आजही होत आहे… त्यांनी आपल्या जीवनात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचे भाकीत देखील केले आहे. या गोष्टी जाणून घेण्यात अनेक लोकांना रस असतो. चाणाक्य यांनी माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींचे भाकीत केले आहे. पण, चाणाक्य म्हणताता की, जेव्हा सर्व काही गमावले असे वाटते, तेव्हा जर तुम्ही या गोष्टी केल्या तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
सर्वात आधी तर भूतकाळाचा विचार करणे सोडा. भूतकाळाचा विचार करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. तसेच, तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकून पुढे जायला हवे. जर तुम्ही जुन्या गोष्टी मनात घोळवत राहिलात, तर त्या तिथेच राहतील. चाणक्य म्हणतात की, आज काय करायचे आणि काय नाही यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कठीण काळात तुम्हाला खंबीर राहण्याची गरज असते आणि अशा परिस्थितीत काही लोकांना तुम्ही कमजोर वाटू शकता. परंतु, अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमची प्रतिभा आणि कौशल्ये शोधून काढणे आवश्यक आहे. जर तुमचा तुमच्या चांगल्या गोष्टींवर विश्वास असेल, तर तुमच्यासमोर कितीही आव्हाने आली तरी, प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याचे धैर्य तुमच्यात येईल.
आयुष्यात वेळ कधीच थांबत नाही आणि कोणतीही अडचण कायमची नसते, प्रत्येक समस्येचा शेवट असतोच. कठीण काळातही, जर तुम्ही धैर्यवान असाल आणि संयमाने प्रयत्न करत असाल, तर चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही कुठेही घाई केली नाही आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतले, तर यश तुमचेच आहे.
चाणक्याच्या नीतिमूल्यांनुसार, पराभव हा जीवनातील एक मोठा धडा आहे. तसेच, ती एका नव्या सुरुवातीची पहिली पायरी आहे. जर तुम्ही यांचे पालन केले, तर तुम्ही खंबीरपणे उभे राहू शकाल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)