AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

२५ हजाराची नोकरी सोडून तरुण कॅब चालवू लागला, आताची कमाई ऐकून सीईओ देखील झाले आश्चर्यचकीत, viral video

एआयच्या युगात आज अनेक लोक पारंपारिक नोकरीला राजीनामा देत स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लाखो लोक यावर कमेंट करत आहेत.

२५ हजाराची नोकरी सोडून तरुण कॅब चालवू लागला, आताची कमाई ऐकून सीईओ देखील झाले आश्चर्यचकीत, viral video
cab driver news
| Updated on: Jun 20, 2026 | 4:51 PM
Share

अनेकांना महिन्याच्या एक तारखेला मिळणाऱ्या पगाराची हमी देणारी नोकरी बरी वाटते. तर काही जणांना स्वत:च्या कामाचे तास फिक्स करण्याचे स्वातंत्र्य देणारा व्यवसाय महत्वाचा वाटतो. सकाळी ९ ते ५ काम करुन नंतर सायंकाळी कुटुंबासोबत वेळ घालवणे याला काही लोक प्राधान्य देत असतात. मात्र, आता सोशल मीडियावर एका कॅब चालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याने ९ ते ५ ची २५ हजार रुपयांची नोकरी सोडून मोबाईल अॅप टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची कमाई ऐकून तु्म्हाला धक्का बसेल..

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ गुरुग्राम येथील इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनी जिप इलेक्ट्रिकचे CEO आकाश गुप्ता यांनी एका कॅब ड्रायव्हरशी केलेल्या गप्पांचा आहे. तो इंटरनेटवर खूप व्हायरल होते आहे.

या व्हिडीओत आकाश गुप्ता कॅब ड्रायव्हरला त्याच्या कमाई आणि जुन्या नोकरी संदर्भात प्रश्न विचारतात. या गप्पांमध्ये ड्रायव्हर सांगतो की तो आधी एका कंपनीत नोकरी करत होता. जेथे त्याला महिन्याला सुमारे २५ हजार रुपयांचे वेतन मिळत होते.

यानंतर सीईओ आकाश गुप्ता हसतच या तरुणाला विचारतात की मग आता १ लाख कमावत असशील ? या प्रश्नावर ड्रायव्हर देखील हसत उत्तर देतो की पहिल्यापेक्षा त्याची कमाई खूपच चांगली आहे. ज्यादा कमाईच्या शक्यतेनेच त्याने नोकरी सोडण्याचे म्हटले जाते.

व्हिडिओने चर्चेला उधाण

ही चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांचे आता दोन गट पडले आहेत. काही युजर्सचे म्हणणे आहे की जर मेहनतीच्या बळावर ही कमाई होत असेल तर स्वयंरोजगाराचा पर्याय चांगला असू शकतो. तर अनेक लोकांनी नोकरीला स्थिर उत्पन्नाची हमी, सामाजिक सुरक्षा आणि अन्य सुविधांचे महत्व देखील असते.

गिग इकॉनॉमीवर पुन्हा चर्चा

या व्हिडियोने भारतात वेगाने वाढणाऱ्या गिग इकॉनॉमी संदर्भात मोठ्या चर्चेला पेव फुटले आहे. गिग इकॉनॉमी एक अशी व्यवस्था आहे. ज्यात लोक कोणा कंपनीसोबत स्थायी कर्मचारी बनण्याऐवजी फ्रीलान्स, कॉन्ट्रॅक्ट वा टास्क-आधारित काम करतात. त्यांना महिन्याचे निश्चित वेतनाऐवजी केलेल्या काम वा पूर्ण केलेल्या सर्व्हीसच्या हिशेबाने पैसे मिळतात. गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने लोक फुड डिलिव्हरी, कॅब ड्रायव्हिंग आणि अन्य ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी जोडले जाऊन पारंपारिक नोकरीच्या ऐवजी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारत आहेत. अनेक लोकांचे म्हणणे आहे की यात मेहनतीच्या हिशेबाने कमाई वाढवण्याची संधी मिळते, जेव्हा काही लोक या क्षेत्राला अनिश्चितेचे क्षेत्र मानतात.

येथे व्हिडीओ पाहा –

View this post on Instagram

A post shared by Mo (@mo.of.everything)

सोशल मीडियावर काय म्हणतात लोक?

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सने लिहिले की आजच्या काळात केवळ नोकरी कमाई एकमात्र मार्ग राहिलेला नाही.काही लोकांनी म्हटले की प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो आणि कमाई अनेक बाबींवर अवलंबून असते. यासाठी एका उदाहरणावरुन सर्वांबाबत निष्कर्ष काढता येत नाही.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला