AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिंदे गट भाजपात विलीन होणार? एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर? त्या ट्विट्ने मोठी खळबळ

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहे, ते खासदार आता लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यास एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार आहे, मात्र त्यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! शिंदे गट भाजपात विलीन होणार? एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर? त्या ट्विट्ने मोठी खळबळ
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर?Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 20, 2026 | 5:08 PM
Share

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला.  दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जवळपास अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य़मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले.

या फुटीनंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे यावेळी तब्बल 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. हे सर्व खासदार आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.  या खासदारांनी जर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर केंद्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचं बळ वाढणार आहे. मात्र आता या सर्व घडामोडी सुरू असतानाच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे मोठी खळबळ उडाली आहे, त्यांनी मोठा दावा केला आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गमंत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदे समोर एक अट ठेवली आहे की शिंदे गट भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ?’ असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे ओमराजे यांनी देखील शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. आज पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला आहे, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे, मी अजून पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर