Chanakya Niti : चाणक्य म्हणतात असे लोक साप, विंचवापेक्षाही विषारी असतात; त्यांच्यापासून लांब राहण्यातच हीत
आर्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या स्वभावाचे काही दोष सांगितले आहेत, ते म्हणतात की अशा लोकांपासून लांब राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण असे लोक साप आणि विंचवापेक्षाही विषारी असतात.

आचार्य चाणक्य हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ, राजनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी एका सामान्य मुलाला चंद्रगुप्त मौर्य यांना आपल्या कुटनीतीच्या बळावर मगधसारख्या शक्तिशाली राज्याचा राजा बनवलं अशी आख्यायिका आहे. आर्य चाणक्य हे केवळ कुटनीतीतज्ज्ञच नव्हते तर त्यांचा समाजातील प्रत्येक घटकाचा अभ्यास होता. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी समाजाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरत आहे.
आर्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या स्वभावाचे काही दोष सांगितले आहेत, ते म्हणतात की अशा लोकांपासून लांब राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण असे लोक साप आणि विंचवापेक्षाही विषारी असतात. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल
चतुर आणि लालची लोक
चाणक्य म्हणतात की जे लोक दुसर्याच्या प्रगतीवर जळतात, स्वार्थी असतात अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, तुमच्यावर कितीही कठीण परिस्थिती असली तरी देखील अशा लोकांकडे तुम्ही कधीच मदत मागवू नका. कारण असे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमचं नुकसान करू शकतात.
अभिमानी व्यक्ती
चाणक्य म्हणतात की ज्या लोकांना फुकटचा अभिमान असतो, अशा लोकांपासून चार हात दूरच राहा. असे लोक आपल्या शुल्लक अभिमानासाठी तुमच्या मैत्रिचा विश्वासघात करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत, ते तुम्हाला धोका देऊ शकतात.
रागीट लोक
आर्य चाणक्य म्हणतात ज्या लोकांचा स्वभाव हा रागीट असतो. त्यांच्यापासून दूर राहण्यातच हीत असतं. असे लोक शुल्लक कारणांवरून देखील तुमच्यावर चिडू शकतात. असे लोक रागाच्या भरात अनेकदा चुकीचे निर्णय घेत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेलंच चांगलं. असे लोक तुमचं मोठं नुकसान करू शकतात. त्यामुळे तुम्हाला कितीही मदतीची गरज असेल तरी अशा लोकांना मदत मागू नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
