
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना मार्गदर्शन करतो. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? याबाबत माहिती दिली आहे.
आर्य चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात, किंवा ठिकाणं असतात त्यापासून दूर राहण्यातच माणवाचं हीत असतं. वेळ निघून गेल्यानंतर तुमच्या हाती पश्चतापाशिवाय काहीही राहात नाही. त्यामुळे माणसानं योग्य वयात योग्य गोष्टी कराव्यात आणि चुकीच्या गोष्टींपासून दूर राहावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं? ते जाणून घेऊयात.
जीथे तुमचा अपमान होतो – आर्य चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीला आपला सन्मान महत्त्वाचा असतो, तो त्याने जपलाच पाहिजे, जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या ठिकाणी वारंवार अपमान होत असेल तर अशा ठिकाणी त्या व्यक्तीनं आयुष्यात परत कधीच जाऊ नये, त्यातच त्याचं हीत आहे.
बेरोजगारी – आर्य चाणक्य म्हणतात अर्थाजन हे प्रत्येक व्यक्तीचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे. तुमच्या संकट काळात पैसा हाच तुमच्या उपयोगी पडणार आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं आयुष्य चांगलं जगायचं असेल, तर अशा ठिकाणांपासून दूर राहा जिथे तुम्हाला रोजगार मिळणार नाही. तुम्हाला जर रोजगार मिळाला नाही, तर कालांतरानं तुमच्या अंगात कष्ट करण्याची सवय राहणार नाही, भविष्यात त्याचा मोठा फटका हा तुम्हाला बसू शकतो.
जिथे तुमचं कोणीच नाही – आर्य चाणक्य म्हणतात ज्या ठिकाणी तुमचं कोणीच नाही, अशा ठिकाणी जाणं टाळा, कारण त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
जिथे शिक्षण नाही – आर्य चाणक्य म्हणतात माणसानं आयुष्यभर काहीना काही सतत शिकत राहिलं पाहिजे, पण ज्या ठिकाणी तुम्हाल शिक्षणच मिळणार नाही अशा ठिकाणी जाण म्हणजे तुमचा वेळ व्यर्थ घालवणं आहे.
जिथे वाद होतात – आर्य चाणक्य म्हणतात ज्या घरात सारखे भांडणं होतात, वाद होतात त्या घरात जाऊ नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)