Chanakya Niti : आर्य चाणक्य म्हणतात चुकूनही या चार ठिकाणी जाऊ नका, बरबाद व्हाल
आर्य चाणक्य हे एक थोर विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये अनेक गोष्टींबद्दल माहिती दिली आहे. राजा कसा असावा? राजाचा प्रजेसोबतचा व्यवहार कसा असावा? प्रजेनं काय करावं? काय करू नये. आयुष्य जगताना कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टी टाळव्यात? आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पती कसा असावा? आदर्श पतीची लक्ष काय असतात? अशा ऐकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य निती नावाच्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य म्हणतात असे काही ठिकाणं असतात जिथे चुकूनही मनुष्याने जाऊ नये. तिथे गेल्यास त्याला आयुष्यातील फार मोठी किंमत मोजावी लागते. फार मोठं नुकसान होत, आयुष्यही बरबाद होऊ शकतं. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी काय सांगितलं आहे त्याबद्दल
आर्य चाणक्य म्हणतात जिथे तुमचा वारंवार अपमान होतो, तिथे तुम्ही चुकूनही जाऊ नका. जर एखाद्या ठिकाणी तुमच्या अस्थित्वाला ठेच पोहोचत असेल, तुमची दखल घेतली जात नसेल तिथे तुम्ही चुकूनही जाऊ नका.
जे ठिकाण व्यसनाचा अड्डा आहे. तिथे लोक व्यसनाच्या आहारी गेले आहेत, तिथे चुकूनही तुमचे पाऊल पडता कामा नये, कारण तुम्हालाही त्या गोष्टीची सवय लागू शकते असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जुगार – जिथे जुगाराचा अड्डा आहे, अशा ठिकाणी थांबू नका, जाऊ नका. कारण जुगार हा असा नाद आहे, तो एकदा लागला तर तुम्ही तुमची संपूर्ण संपत्ती गमाऊ शकतात, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जिथे तुम्हाला नकारात्मक ऊर्जेची अनूभुती येते, तिथे देखील जाऊ नका असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
