Chanakya Niti : मोठं संकट येण्यापूर्वी घरात या गोष्टी घडतातच, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात कोणतंही संकट येण्यापूर्वी त्याचे संकेत नक्कीच मिळत असतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या माणसाला आपलं जीवन जगत असताना मार्गदर्शक ठरतात. माणसाने जीवन कसं जागवं? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. एक आदर्श कुटुंब कसं असावं? आदर्श घर कसं असावं, मुलांचं आपल्या आई वडिलांसोबत नातं कसं असावं? आई -वडिलांनी आपल्या मुलांवर संस्कार कसे करावेत? याबद्दल चाणक्य यांनी एक ना अनेक गोष्टी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या घरावर काही मोठं संकट येणार असतं, तेव्हा त्याचे काही संकेत तुम्हाला आधीच मिळायला सुरुवात होते. हे संकेत जर तुम्हाला ओळखता आले तर तुम्ही त्या संकटामधून वाचू शकतात. परंतु हे संकेत जर तुम्ही वेळीच ओळखले नाहीत, तर मात्र तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. जेव्हा तुमच्यावर कोणतंही संकट येणार असतं, त्याचा सर्वात मोठा संकेत असतो, तो म्हणजे तुमच्या स्वभावात अचानक बदल होतो. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
स्वभावात बदल – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्यावर एखादं मोठं संकट येणार असेल तेव्हा त्याचा सर्वात मोठा संकेत असतो, तो म्हणजे तुमच्या स्वभावात अचानक बदल होतो. जसं की तुमचा स्वभाव चिडचिडा होतो. तुम्ही कोणावरही विनाकारण चिडता. अनेकदा तुम्ही रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतात, त्याचा सर्वात मोठा फटका हा तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात बसू शकतो. त्यामुळे माणसाने कोणताही निर्णय घेताना तो शांत राहूनच घेतला पाहिजे. शांत डोक्याने घेतलेले निर्णयच भविष्यात फायद्याचे ठरतात, असं चाणक्य म्हणतात.
भांडणं – चाणक्य म्हणतात घरात काहीही कारण नसताना जर भांडणं होत असतील तर समजून जा, हे घर लवकरच एखाद्या मोठ्या संकटात सापडणार आहे, त्यामुळे नेहमी भांडणं टाळले पाहिजे. विचाराने सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)