
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही नीती सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात, तसेच चाणक्य यांचे विचारही प्रेरणादायी आहेत. आर्य चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ होते, व्यक्तीला आयुष्यात आर्थिक संकट का येतात? त्यातून कसा मार्ग काढायचा याबाबत देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माहिती दिली आहे.
आर्य चाणक्य म्हणतात पैसा ही अशी गोष्ट आहे, ती जर तुमच्याकडे असेल तर तुमचं आयुष्य सुखा समाधानानं आणि आनंदात जाऊ शकतं. तुम्ही तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करू शकतात. तुमच्यावर जेव्हा संकट येत त्यावेळी पैसाच तुमच्या उपयोगी येतो, त्यामुळे कठीण परिस्थितीसाठी पैशांची बचत केली पाहिजे. जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय म्हटलंय?
मेहनत – आर्य चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही तुमच्या तरुण वयात जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं म्हतारपणात तुमचं आयुष्य सुखात जाईल. कारण तेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीमधून कष्ट करून मिळवलेले चार पैसे तुमच्या गाठीशी असतील. म्हतारपणात तुम्हाला कष्ट करण्याची गरज भासणार नाही.
बचत – आर्य चाणक्य म्हणतात अनेकांना पैशांची उधळपट्टी करण्याची सवय असते, अनेक जण अनावश्यक खर्च करतात. ज्या वस्तुंची आपल्याला अवश्यकता नाही, मात्र हातात पैसा आहे, अशा स्थितीमध्ये आपण अशा अनेक गोष्टी खरेदी करतो. कालातंराने या सर्व वस्तु नष्ट होतात. आणि आपला पैसा देखील खर्च होतो. त्यामुळे पैशाची बचत केली पाहिजे.
अनावश्यक खर्च टाळा – आर्य चाणक्य म्हणतात अनेकजण नको त्या गोष्टींवर पैशांची उधळपट्टी करतात. यामुळे तुम्ही तुमच्या मेहनतीने कमावलेला पैसा व्यर्थ घालतात हे टाळलं पाहिजे.
गुंतवणूक – आर्य चाणक्य म्हणतात पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता आली पाहिजे, हाच पैसा तुम्हाला तुमच्या भविष्यात कामी येणार आहे.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)