Chanakya Niti : चाणक्य म्हणतात फक्त हे चार लोकच संकटाच्या काळात तुम्हाला खरी मदत करू शकतात

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आपला खरा मित्र कोण आणि शत्रू कोण? हे कसं ओळखायचं? यासंदर्भात चाणक्य यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात फक्त हे चार लोकच संकटाच्या काळात तुम्हाला खरी मदत करू शकतात
चाणक्य
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 18, 2025 | 7:10 PM

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी स्वभावाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, म्हणूनच आपल्याला नेहमी सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, तेव्हा आपण आपली अडचण आपल्या काही जवळच्या व्यक्तींना सांगतो, मात्र त्यातील असा एखादाच व्यक्ती असतो जो तुमच्या संकटात तुमच्या मदतीला धावून येतो, तर अनेक जण मात्र तुमच्या या संकटाचा फायदा घेऊन तुम्ही आणखी अडचणीमध्ये कसे याल यासाठी प्रयत्न करत असतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपले हितचिंतक कोण? हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी चाणक्य यांनी चार कसोट्या सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही या चार कसोट्यांच्या आधारावर तपासून पाहिलंत तर तुमची आयुष्यात कधीच फसवणूक होणार नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी काय सागितलंय? त्याबद्दल.

चारित्र्य – चाणक्य म्हणतात व्यक्तीची परीक्षा ही कधीही त्याच्या चारित्र्यावरून करायची असते, जे व्यक्ती चारित्र्यवान असतात, अशा व्यक्तींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतात, असे व्यक्ती काहीही झालं तरी एकदा दिलेला शब्द कधीच मोडणार नाहीत, तसेच जर तुम्हाला मदत करणं शक्य नसेल तर ते तुम्हाला तुमच्या तोंडावर सांगतील आणि जर मदत करणं शक्य असेल तर निस्वार्थ मनाने तुमची मदत करतील, त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवल्यास कोणतंही नुकसान होत नाही.

खरा मित्र – चाणक्य म्हणतात तुमचा खरा मित्र कोण? हे आयुष्यात तुम्हाला माहिती असणं खूर गरजेचं असतं, ही गोष्ट तुम्ही अनुभवातून शिकता, एकदा तुम्हाला कळालं की तुमचा खरा मित्र कोण आहे, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता, असे लोक तुमच्या मदतीसाठी कधीही हजर असतात.

निस्वार्थी लोकं – चाणक्य म्हणतात तुम्हाला मदत करण्यामागे ज्याचा काहीही स्वार्थ नाही, मात्र तरी देखील तो तुमची मदत करत आहे, अशा लोकांना नेहमी मान-सन्मान द्यावा.

सत्य- चाणक्य म्हणतात जो व्यक्ती नेहमी सत्याचा पक्ष घेतो, अशा लोकांपासून तुम्हाला कोणताही धोका नसतो, असे लोक कधीही विश्वासघात करत नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)