Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या पाच जागांपासूनच दूरच राहा, अन्यथा येईल पश्चतापाची वेळ
आर्य चाणक्य हे महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही जीवन जगताना अनेकांना मार्गदर्शक ठरतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ, कुटनीती तज्ज्ञ आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात. आयुष्यात कोणत्या चुका करू नयेत, काय करावं? आपला खरा मित्र कसा ओळखावा, आपला शत्रू कसा ओळखावा? पती-पत्नीचं नातं कसं असावं? पतीची कर्तव्य काय आहेत? अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये असे काही ठिकाणं सांगितलेल्या आहेत. त्या ठिकाणांपासून लांब राहण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आर्य चाणक्य म्हणतात की जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल तर तुमच्यावर आयुष्यात पश्चतापाची वेळ येऊ शकते. आज आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
जिथे तुमचा अपमान होईल – आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही अशा जागेपासून कायमच दूर राहिलं पाहिजे, जिथे तुमचा अपमान झाला असेल, किंवा भविष्यात तुमचा अपमान होऊ शकतो अशी शक्यता असेल.
बेरोजगारी – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही जर अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला रोजगार मिळण्याची शक्यता दिसत नसेल तर असं ठिकाण सोडणं हेच तुमच्या हिताचं असतं, कारण तुम्हाला जर रोजगार मिळाला नाही तर तुमच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जिथे तुमचं कोणीच नाही – आर्य चाणक्य म्हणतात अशी ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, जिथे तुमचं कोणीच नाही, किंवा तुम्हाला ओळखणारं कोणी नाही, तुम्ही अशा ठिकाणी गेलात तर तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते.
जिथे शिक्षण नाही – आर्य चाणक्य म्हणतात अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नका, जिथे शिक्षण नाही. यामुळे तुम्ही शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका असतो.
जिथे कोणताही गुण नसतो – आर्य चाणक्य म्हणतात तुम्ही अशा ठिकाणी चुकूनही जाऊ नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)