Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत तसेच अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये एका कुटुंबप्रमुखाकडे कोण कोणते गुण असावेत? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात हे गुण जर कुटुंबप्रमुखाकडे नसतील तर संपूर्ण घर बरबाद होतं.

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. आदर्श कुटुंबप्रमुख कसा असावा? त्याची लक्षणं काय आहेत? त्याच्या कडे कोणते गुण असावेत? आणि हे गुण जर त्याच्याकडे नसतील तर काय होतं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात कोणत्याही घरात कुटुंबप्रमुखाची भूमिका सर्वात मोठी असते. जर आपण एखाद्या कुटुंबाला झाडाची उपमा दिली तर कुटुंबप्रमुख हा त्या झाडाची मुळं असतो. या मुळांवरच त्या संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा असतो. मात्र ही जर मुळं कमकुवत झाली तर ते झाड फार काळ तग धरू शकणार नाही. ते झाड कोसळणार त्यामुळे घरातील कुटुंबप्रमुखाकडे काही गोष्टी असणं गरजेचं असतं, त्या गोष्टी जर त्याच्याकडे नसतील तर संपूर्ण कुटुंब बरबाद होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
पैसा – चाणक्य म्हणतात जगात पैशाएवढं महत्त्व कोणालाही नाही, त्यामुळे कुटुंबप्रमुखाने आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी पैसे हे कमावलेच पाहिजे, हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे. कारण संपूर्ण कुटुंब हे त्याच्यावरच अवलंबून असतं.
कर्तव्यनिष्ठा – केवळ पैसा कमावून आणणं हेच कुटुंबप्रमुखाचं एकमेव कार्य नाही. तर कुटुंब प्रमुखाच्या आपल्या कुटुंबाप्रती आणखी काही जबाबदाऱ्या असतात, त्या जबाबदाऱ्या त्याने पार पाडल्या पाहिजेत.
शिक्षण – आपल्या मुलांना चांगलं आणि उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी घरातील कुटुंबप्रमुखाने नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, कारण मुलांचं शिक्षण ही देखील एकप्रकारची भविष्यातील गुंतवणूकच असते.
धर्म – चाणक्य म्हणतात कुटुंबप्रमुखावर जशी घराची जबाबदारी असते, तसंच त्याचं धर्मासाठी देखील काही कर्तव्य असतं. त्यामुळे त्याने आपला दिवसभरातील थोडा वेळ हा धर्मासाठी दिला पाहिजे.
सामाजिक जाणीव – आपण घरची जबाबदारी तर सांभाळतोच आहोत, मात्र आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव देखील त्याच्यामध्ये पाहिजे असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)