AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदेंचा फोन अन् अरबाज शेखला मोठा दिलासा, सोलापुरातील त्या हॉस्पिटलने घेतला मोठा निर्णय

सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरातील डॉ. वळसंगकर हॉस्पिटलचा पुढाकार; संपूर्ण वैद्यकीय मदत करण्याचे केले मान्य.

शिंदेंचा फोन अन् अरबाज शेखला मोठा दिलासा, सोलापुरातील त्या हॉस्पिटलने घेतला मोठा निर्णय
| Updated on: Jul 11, 2026 | 6:18 PM
Share

‘सैराट’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांच्या उपचारासाठी सोलापुरातील एस पी न्युरोसायन्स सेंटरचे डॉ. अश्विन वळसंगकर यांनी पुढाकार घेत संपूर्ण वैद्यकीय मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अरबाज शेख याच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र या उपचारासाठी मोठा आर्थिक खर्च झाल्याने कुटुंबासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले. यासंदर्भात अरबाज शेखने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज व्यक्त केली होती. तसेच काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचाही मुद्दा त्याने मांडला होता.

एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अरबाजची भेट

अरबाज शेखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तातडीने सोलापुरात जाऊन अरबाज शेखच्या कुटुंबाची भेट घेण्याच्या सूचना दिल्या.

उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अरबाज शेखची भेट घेऊन त्यांच्या वडिलांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली. तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

डॉ. अश्विन वळसंगकर यांचा सकारात्मक प्रतिसाद

यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापुरातील एस पी न्युरोसायन्स सेंटरचे डॉ. अश्विन वळसंगकर यांच्याशी संपर्क साधून अरबाज शेखच्या वडिलांच्या उपचारासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. अश्विन वळसंगकर यांनी उपचारासाठी आवश्यक ती संपूर्ण वैद्यकीय मदत करण्याचे मान्य केले.

डॉ. वळसंगकर यांच्या या निर्णयामुळे अरबाज शेखच्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, पुढील उपचार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?