Chanakya Niti| आयुष्यात 3 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, जवळ गेलात तर करावा लागेल संकटांचा सामना

| Updated on: Nov 20, 2021 | 7:44 AM

प्रत्येकाला सुखी आयुष्याची इच्छा असते. पण सुख आणि दु:ख हे दोन्ही जीवनातील महत्त्वाच्या बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीला वेळोवेळी या दोन्हींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा आपले काही चुकीचे निर्णय आपल्याला दुःखात घेऊन जातात.

Chanakya Niti| आयुष्यात 3 गोष्टींपासून दोन हात लांबच राहा, जवळ गेलात तर करावा लागेल संकटांचा सामना
chanakya-niti
Follow us on

मुंबई : प्रत्येकाला सुखी आयुष्याची इच्छा असते. पण सुख आणि दु:ख हे दोन्ही जीवनातील महत्त्वाच्या बाजू आहेत. प्रत्येक व्यक्तीला वेळोवेळी या दोन्हींचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा आपले काही चुकीचे निर्णय आपल्याला दुःखात घेऊन जातात. त्यांच्यातील फरक समजून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आचार्यांची चाणक्य नीतीमधील काही गोष्टी लक्षात घ्यायाला हव्या.

चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी सुखी जीवनाचे रहस्य सांगितले आहे आणि अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या लोकांच्या दुःखाचे कारण बनू शकतात. आचार्यांनी आपल्या नितीशास्त्र ग्रंथात तीन गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात खुश राहण्यासाठी आर्थिक किंवा सामाजिकदृष्ट्या शक्तिशाली व्यक्ती, अग्नी आणि स्त्री या तिन गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. आचार्याच्या मते या तिन गोष्टींपासून फार अंतर ठेवणे ही चांगले नाही असे झाल्यास, आपण केवळ तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता.

– जर एखदी व्यक्ती अत्यंत सामर्थ्यवान असेल आणि ती तुमच्या सानिध्यात असेल तर . काही वेळा त्याला शक्तिशाली व्यक्तीच्या हाताखाली काम करावे लागते. परंतु जर त्याने त्यांच्यापासून खूप अंतर ठेवले तर तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी मिळू शकणार नाहीत. त्यामुळे अशा लोकांपासून अंतर आणि जवळीक या दोन्ही गोष्टी वाईट असतात.

– अग्नीने आचार्य चाणक्य सांगतात, माणसाने अग्नीचा शोध लावला पण या अग्नी पासून दोन हात लांब राहणे केव्हाही चांगले.

– आचार्य चाणक्य स्त्रीबद्दल म्हणतात समाजात स्त्रीची भूमिका पुरुषाइतकीच आहे. पण त्यांच्या खूप जवळ जाऊन तुम्ही चुकीच्या मार्गावर जाऊ शकता किंवा मत्सराचा बळी होऊ शकता. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच स्त्रीपासून फारसे अंतर किंवा जवळीक चांगली नाही

संबंधित बातम्या :

Mirror Vastu Tips : घरात आरसा कोणत्या दिशेला लावावा, जाणून घ्या आरशाशी संबंधित सर्व महत्त्वाचे वास्तु नियम

Peacock Feather Remedies | मोराचे पिस केवळ वास्तू दोषच नाही तर नकारत्मकाता देखील काढते, जाणून घ्या याचे जादूई उपाय