Chanakya Niti: तुमच्या जोडीदारामध्ये हे 4 गुण आहेत का? चाणक्य म्हणतात तरच लग्न करा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, आज आपण त्यातीलच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti: तुमच्या जोडीदारामध्ये हे 4 गुण आहेत का? चाणक्य म्हणतात तरच लग्न करा
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 7:49 PM

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नवाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? पतीची जबाबदारी काय? पत्नीची जबाबदारी काय? या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती पत्नी हे एकाच रथाचे दोन चाकं असतात. जोपर्यंत हा रथ समान गतीने धावतो आहे, तोपर्यंत संसार सुखाचा होतो. परंतु या संसाररूपी रथाचं एक जरी चाक पुढे मागे झालं तर मात्र हा रथ कोलमडून पडतो. असं कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यामुळे पती-पत्नीने आपलं कर्तव्य, जबाबदार्‍या योग्य पद्धतीने पार पाडणं गरजेचं असतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात असे काही विशिष्ट गुण असतात, ते जर तुमच्या जोडीदाराकडे असले तर तुमचा संसार हा सुरळीत चालतो. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी हे गुण तुमच्या जोडीदाराकडे आहेत का हे तपासून पाहिलं पाहिजे, आणि त्यानंतरच मग लग्न केलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

बोलण्यात कठोरता – चाणक्य म्हणतात तुमचा जोडीदार स्पष्ट आणि कठोर बोलणारा असेल तर तो तुमच्यासाठी योग्य आहे. कारण अशा लोकांच्या मनात कधीही कपट नसतं. परंतु जे लोक अतिगोड बोलतात, त्यांच्या मनात कुठे नं कुठे स्वार्थाची भावना असते. असे लोक आपल्या स्वार्थ साध्य करण्यासाठी तुमच्याशी गोड बोलतात, त्यामुळे कधीही जोडीदार म्हणून तुम्ही अशा लोकांची निवड करू नका.

संयम – चाणक्य म्हणतात या जगात संयम हे सर्वात मोठं शस्त्र आहे. ज्याच्याकडे संयम आहे, तो जग जिंकतो. त्यामुळे सर्वात आधी तुमच्या होणाऱ्या पती किंवा पत्नीकडे संयम नावाची गोष्ट आहे का? ते आधी तपासा आणि त्यानंतरच लग्नाचा निर्णय घ्या असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चंचल आणि असंतुष्ट – चाणक्य म्हणतात जर तुमचा जोडीदार चंचल आणि असंतुष्ट असेल तर अशा व्यक्तीसोबत कधीही लग्न करू नका. कारण असे लोक तुम्हाला कधीही धोका देऊ शकतात. त्यामुळे जोडीदाराची नीट पारख करूनच लग्नाचा निर्णय घ्यावा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

गुपीतं उघड करणारा – चाणक्य म्हणतात पती-पत्नीमध्ये काय सुरू आहे, हे त्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे, ही गोष्ट जेव्हा तिसऱ्याला कळते तेव्हा तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे पती-पत्नीने दोघांमधील गोष्टी या नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us