Chanakya Niti : मुलांसमोर असे कधीही वागू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागेल! 

आचार्य चाणक्य यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला पण परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटामधून त्यांनी शिकवण घेतली आणि पुढे जात राहिले. आचार्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि अनुभवामुळे अशी कामे केली, ज्यासाठी ते आजही लक्षात आहेत.

Chanakya Niti : मुलांसमोर असे कधीही वागू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागेल! 
चाणक्य नीति
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 8:37 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला पण परिस्थितीसमोर कधीही हार मानली नाही. येणाऱ्या प्रत्येक संकटामधून त्यांनी शिकवण घेतली आणि पुढे जात राहिले. आचार्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आणि अनुभवामुळे अशी कामे केली, ज्यासाठी ते आजही लक्षात आहेत. आचार्यांनी जीवनात जे काही अनुभव घेतले, त्याचे सार त्यांनी लोकांसमोर मांडले. आचार्य यांनी पालकांनाही मुलांच्या संगोपनाची शिकवण दिली आहे. येथे जाणून घ्या अशा वर्तनाबद्दल जे कधीही आपण आपल्या मुलांसमोर करू नये.

चुकूनही मुलांसमोर या गोष्टी करू नका

1. मुलांसमोर कधीही अनुशासनहीनता दाखवू नका. लक्षात ठेवा मुले निर्दोष असतात. त्यांच्यासाठी त्यांचे पालक ही पहिली शाळा असते. त्यांच्या पालकांनी त्यांच्यासमोर जे उदाहरण मांडले तेच ते शिकतात. मुलांसमोर अनुशासनहीनतेचे उदाहरण मांडले तर मुलं निरंकुश होतील आणि त्याचा फटका तुम्हाला भविष्यात सहन करावा लागेल.

2. बऱ्याच वेळा पालक काही गोष्टी लपवण्यासाठी मुलाला खोटे बोलण्यास सांगतात. परंतु जर मुलाने एकदा खोटे बोलणे शिकले तर तो भविष्यात नेहमी खोटे बोलेल. तुमच्याशीही खोटे बोलेल. म्हणूनच मुलांना कधीही खोटे बोलायला सांगू नका. किंवा त्यांच्यासमोर तुम्ही कधीही खोटे बोलू नका.

3. मुलांसमोर कधीही चुकीचे शब्द वापरू नका. तुम्ही ते शब्द कोणत्याही परिस्थितीत बोलता, परंतु मुलांना तुमची परिस्थिती समजणार नाही. ते फक्त तुमच्या शब्दांचे पालन करतील आणि तेच चुकीचे शब्द बोलायला शिकतील. त्यामुळे मुलांसमोर कधीही अयोग्य वर्तन करू नका.

4. आपल्या पत्नीचा कधीही अपमान करू नका आणि पत्नीनेही आपल्या पतीचा अपमान करू नये. मुलेही त्यांच्या पालकांकडून नातेसंबंधांचे महत्त्व जाणून घेतात. जर तुम्ही एकमेकांच्या आदराची काळजी घेतली नाही तर तुमचे मुलेही तेच करतील. त्यामुळे सर्व नातेसंबंधांचा नेहमी आदर करा.

संबंधित बातम्या : 

काय सांगता ! तुमच्या खाण्याच्या सवयी तुमचं नशीब बदलू शकतात? विश्वास बसत नसेल तर ट्राय करुन पाहा

Dream Indication | स्वप्नात मृत व्यक्ती आली? घाबरून जाऊ नका हा तर शुभ संकेत, जाणून घ्या तुमची स्वप्न तुम्हाला काय सांगतात