Chanakya Niti : प्रत्येक माणसानं पोपटाकडून हे गुण शिकलेच पाहिजेत, आयुष्यात पराभव होणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की प्रत्येक प्राणी आणि पक्ष्यापासून माणसानं काही न काही शिकायला पाहिजे. एवढा छोटा पोपट पण तो देखील आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : प्रत्येक माणसानं पोपटाकडून हे गुण शिकलेच पाहिजेत, आयुष्यात पराभव होणार नाही
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 8:32 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळात देखील लागू पडतात. चाणक्य म्हणतात निसर्ग हा माणसाचा सर्वोत्तम शिक्षक असतो, अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही निसर्गापासून शिकल्या पाहिजेत. या निसर्गात हजारो प्राणी, पक्षी वास्तव्य करतात, प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट असतं, काही गुण असतात, याच बळावर ते आपलं संरक्षण करतात, तसेच जीवन जगत असतात. पोपट हा निसर्गातील अत्यंत छोटा घटक आहे. मात्र जेव्हा तुम्ही पोपटाचं बारकाईने निरीक्षण करतात तेव्हा तुम्हाला याची जाणीव होते, की पोपटाकडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुम्ही या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत, असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

गोड बोलणं – चाणक्य म्हणतात पोपटाची वाणी अत्यंत मधुर असते, पोपट आपल्या वाणीने सहज कोणाचंही मन जिंकू शकतो. त्यामुळेच पोपट हा अनेकांचा आवडता पक्षी असतो. त्याला लोकांकडून नेहमी प्रेम मिळतं. त्याचप्रमाणे आपण देखील आपली वाणी गोड ठेवली पाहिजे, आपल्या बोलण्यामुळे कोणाची मनं दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. जे व्यावसायिक लोक आहेत, त्यांनी तर नेहमी आपल्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवली पाहिजे, तर आणि तरच तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नेहमी सतर्क राहा – चाणक्य म्हणतात मानसानं अखंड सावध असलं पाहिजे, कारण तुमच्यावर कधी कोणता प्रसंग कसा येईल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या संभाव्य संकटासाठी माणसानं नेहमी तयार रहायला हवं, तसेच भविष्यातील संकटाचा अंदाज आधीच घेऊन त्यासाठी योग्य ते नियोजन करून ठेवावं. यामुळे त्या संकटाची तीव्रता कमी होते. मानसानं नेहमी सावध राहावं, यामुळे तुमची फसवणूक होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

सराव करा – चाणक्य म्हणतता पोपटाकडून आणखी एक गुण घेण्यासारखा आहे, तो म्हणजे सराव करा. पोपट हा एक बुद्धिमान प्राणी आहे, त्याला आपण जसं शिकवू तसं तो बोलण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याला जी गोष्ट शिकवली आहे, त्या गोष्टीचा तो वारंवार सराव करतो आणि कलांतराने तो त्या गोष्टीत पारंगत होतो. तसचं जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचं असेल तर सराव करा, तुम्ही जेवढा जास्त सराव कराल, तेवढं यश तुम्हाला त्यामध्ये मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us