AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : जीवनातील 4 सर्वात मोठ्या चुका, ज्या तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. माणसानं आपल्या आयुष्याचं व्यवस्थाप करताना काय करावं? आणि काय करू नये? याबाबत चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

Chanakya Niti : जीवनातील 4 सर्वात मोठ्या चुका, ज्या तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 8:24 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपल्या आयुष्याचं उत्तम व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष्यात माणसाने काय करावं? काय करू नये? तसेच जर तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? याबाबत चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चाणक्य म्हणतात काही चुका या अशा असतात ज्यांना माफी मिळू शकते, त्यामुळे तुमचं फार नुकसान होणार नाही. परंतु अशा देखील काही चुका असतात, ज्या चुकांना कधीच माफी मिळत नाही. या चुकांमुळे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, त्यामुळे अशा चुका आयुष्यात कधीही करता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वेळ – चाणक्य म्हणतात प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वेळेचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येक गोष्ट कदाचित परत मिळेलही, परंतु एकदा तुमच्या हातातून वेळ निघून गेली की त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केल तरी देखील तुम्ही ती वेळ परत आणू शकत नाही, त्यामुळे वेळेचं महत्त्व ओळखा. प्रत्येक काम हे वेळेतच पूर्ण झालं पाहिजे. जर तुम्ही वेळेचं महत्त्व ओळखलं नाही तर भविष्यात तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. मात्र तुम्ही जर वेळेचं महत्त्व ओळखलं तर या जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आरोग्य – चाणक्य म्हणतात भलेही तुम्ही तुमच्या आयुष्यात किहीती पैसा कमवा, परंतु जर तुमचं आरोग्य उत्तम नसेल तर तुम्ही त्या पैशांचा उपयोग करू शकत नाहीत. त्यामुळे सर्वात आधी तुमचं आरोग्य सांभाळा, जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही पैसा पुन्हा कमावू शकतात, मात्र जर तुमचं आरोग्य बिघडलं तर तुम्ही कितीही पैसा कमावला असला तरी देखील त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या.

अज्ञान – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात ज्ञान ही सर्वात मोठी गोष्ट असते, जो व्यक्ती अभ्यास करत नाही. त्याच्याकडे ज्ञान नसते, जो व्यक्ती अडाणी असतो, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. कोणीही त्याची सहज फसवणूक करतं. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नियोजन – चाणक्य म्हणतात जर तुम्ही तुमचं कोणतंही काम नियोजन न करता करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची फार थोडी शक्यता असते. मात्र तुम्ही जर तुमचं प्रत्येक काम हे नियोजनबद्दल पद्धतीने केलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता