Chanakya Niti : आनंदी आयुष्यासाठी पती-पत्नीने रोज ही गोष्ट केलीच पाहिजे, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी सुखी जीवनाची गुरूकिल्ली सांगितली आहे. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे संसारात गोडवा टिकून राहतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसानं आदर्श संसार कसा करावा? पती-पत्नीचं नातं कसं असावं? आपल्या मुलांवर कसे संस्कार करावेत? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नी हे एकाच रथाची दोन चाकं असतात, त्यामुळे जोपर्यंत ही रथाची चाकं व्यवस्थित आहेत, आणि ती समान गतीनं धावत आहेत, तोपर्यंत तो रथ जोरात धावतो. मात्र यातील एक चाक जरी मागे-पुढे झालं किंवा खराब झालं तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी रथ पुढे जाणारच नाही, संसाराचं देखील तसंच आहे. पती आणि पत्नीने एका विचारानं संसार केला तर तो अधिक फुलत जातो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य यांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात ज्या पती-पत्नीमध्ये असणं गरजेचं आहे. पत्नी-पत्नीने त्या गोष्टी केल्याच पाहिजेत.
एकमेकांचा आदर करा – चाणक्य म्हणतात कोणत्याही नात्याचा मुळ पाया हा आदर असतो. त्याला पती-पत्नीचं नातं देखील अपवाद नाही. पती आणि पत्नी दोघांनीही एकमेकांचा आदर केलाच पाहिजे, जर तुम्ही एकमेकांचा आदर कराल तरच तुमचा संसार सुखाचा होईल, अन्यथा कायम तुमच्यामध्ये भांडणं होऊ शकतात. त्यामुळे संसाराची गोडी कमी होईल.
अहंकारापासून दूर रहा – चाणक्य म्हणता जर तुमचा अहंकार आडवा आला तर कोणत्याही नात्याचा शेवट होण्यासाठी फार वेळ लागत नाही, त्यामुळे पती-असो अथवा पत्नी दोघांनीही अहंकारापासून दूर राहिलं पाहिजे. पत्नीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपल पालन पोषण करण्यासाठी पती काबाड कष्ट करत असतो, तर पतीने देखील लक्षात ठेवावं आपलं घर सांभाळण्यामागे पत्नीचे प्रचंड कष्ट असतात. तरच तुमचा संसार सुखाचा होईल.
नात्यात आडपडदा ठेवू नका – चाणक्य म्हणतात ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, पती आणि पत्नी दोघांनी देखील एकमेकांपासून कोणतीच गोष्ट लपवली नाही पाहिजे. तरच तुमचा संसार सुखाचा होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
