Chanakya Niti : पती-पत्नीने या चार गोष्टी केल्याच पाहिजेत, नात्यात कधीच दुरावा येणार नाही, चाणक्यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : पती-पत्नीने या चार गोष्टी केल्याच पाहिजेत, नात्यात कधीच दुरावा येणार नाही, चाणक्यांनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 28, 2026 | 9:38 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पत्नी कोणाला म्हणावं? आदर्श पतीची लक्षणं काय आहेत, अशा अनेक गोष्टींबाबत सविस्तर लिहून ठेवलं आहे. चाणक्य म्हणतात पती असो किंवा पत्नी दोघांनी देखील अशी कोणतीही कृती करू नये, ज्यामुळे आपल्या जीवनसाथीचं मन दुखावलं जाईल. जर वारंवार असे प्रसंग घडत असतील तर तो संसार फार काठ टिकू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके समान गतीने चालली तर संसाराचा गाड धावत राहातो, मात्र यातील एक चाक जरी मागे पडले किंवा त्याने गती बदलली तर असा संसार फार काठ टिकत नाही. नात्यातील गोडवा कमी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. दरम्यान नात्यातील गोडवा टिकून राहवा यासाठी चाणक्य यांनी काही उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.

गोष्टी गुपीत ठेवा – चाणक्य म्हणतात पती-पत्नीमध्ये ज्या खासगी गोष्टी असतात त्या पतीने किंवा पत्नीने कधीही तिसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करू नये. जर दोघांमध्ये कोणत्याही कारणांमुळे वाद झाला असेल तर याची माहिती तिसऱ्या व्यक्तीला कधीही देऊ नये, तर दोघांनीच यावर मार्ग काढावा. तसेच इतरही अनेक अशा गोष्टी असतात ज्या तिसऱ्या व्यक्तीला कधीही सागू नये, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

अंहकार – चाणक्य म्हणतात पती-पत्नीने कधीही आपल्या नात्यात अहकांर आणू नये, जर नात्यात अंहकार असेल तर ते नातं फार काळ टिकत नाही.

विश्वास- चाणक्य म्हणतात पती-पत्नीने नेहमी एकमेकांवर विश्वास ठेवावा, ज्या नात्यात विश्वास असतो ते नातं दीर्घकाळ टिकतं.

प्रेम – चाणक्य म्हणतात पती-पत्नीच्या नात्यामध्ये प्रेम असावं, प्रेम असेल तर संसार दीर्घकाळ टीकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us