Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचं आहे, मग या तीन प्रसंगी माघार घेण्यातच शहाणपणा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात व्यक्तीच्या आयुष्यात कधी-कधी असे प्रसंग येतात, की त्यावेळी त्याने माघार घेणं हेच हिताचं असतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

Chanakya Niti : आयुष्यात यश मिळवायचं आहे, मग या तीन प्रसंगी माघार घेण्यातच शहाणपणा
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 31, 2026 | 10:15 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटीनी तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात यश मिळवण्यासाठी उपयोगी ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे, की व्यक्तीच्या आयुष्यात असे काही प्रसंगी येतात, ज्या प्रसंगामध्ये तुम्ही माघार घेणंच शहाणपणाचं ठरतं, जर तुम्ही अशा प्रसंगात योग्यवेळी माघार घेतली तर तुम्हाला नक्की यश मिळेल, परंतु जर तुम्ही माघार घेतली नाही, तर मग मात्र तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, तुमचं नुकसान होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, आणि असे कोणते प्रसंग माणसाच्या आयुष्यात येऊ शकतात?

शत्रू बलवान असेल तेव्हा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा शत्रू हा तुमच्यापेक्षा बलवान असेल तेव्हा तुम्ही माघार घेतली पाहिजे, तुम्ही माघार घेतली म्हणजे तुमचा पराभव झाला असा त्याचा अर्थ मुळीच नाही तर तुम्ही अशा ठिकाणी जेव्हा माघार घेता तेव्हा तो तुमचा शहाणपणा असतो. तुमचा शत्रू जेव्हा तुमच्यापेक्षा बलवान असतो, तेव्हा त्याचा सामना कधीही बळाच्या जोरावर करू नये, तर त्यासाठी बुद्धी चातुर्याचा उपयोग करावा, साम, दाम, दंड, भेद अशी कोणती नीती तुमच्या शत्रूचा पराभव करण्यासाठी लागू होऊ शकते, याचा आधी विचार करा आणि मगच सर्व तयारी करून शत्रूवर वार करा, यामध्ये नक्कीच तुमचा विजय होईल, परंतु जर तुम्ही कुठलाही विचार न करता थेट बलाढ्य शत्रूसोबत भिडत असाल तर तुमचा पराभव होऊ शकतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

विजयापेक्षा अंहकार महत्त्वाच असतो तेव्हा – चाणक्य म्हणतात जिथे तुम्हाला प्रामाणिकपणे असं वाटत असेल की विजयापेक्षा आपला अंहकार मोठा होत आहे, तिथे वेळीच माघार घ्या, कारण ज्या व्यक्तीला अंहकार असतो, असा व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही विजयी होऊ शकत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा अंहकार अडवा येतो, आणि जिथे अंहकार अडवा येतो तिथे तुम्ही कधीही विजय मिळू शकत नाहीत, अंहकार हा डोळस माणसाला आंधळं करण्याचं काम करतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मार्ग सापडत नसल्यास – चाणक्य म्हणतात जिथे तुम्हाला मार्ग सापडत नाही, अशा ठिकाणी माणसाने थोडं थांबवं, थोंड थांबणं म्हणजे माघार घेणं नव्हे. त्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या मार्गाचा शोध घ्या, यश तुम्हाला नक्की मिळणार, दिशा सापडलेली नसताना कष्ट करणं हे व्यर्थ आहे, जर तुम्ही योग्य दिशेनं कष्ट केलं तर तुम्हाला नक्की यश मिळणार.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us