Chanakya Niti : या ठिकाणी घर बांधण्याची करूच नका चूक, नाही मिळणार सुख, चाणक्यने दिलाय तो धोक्याचा इशारा

Vastu Tips : आपले घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही जण फ्लॅट खरेदी करतात तर काही जण रो हाऊस, चाणक्य नीतीनुसार घर बांधताना या जागांवर ते कधीच बांधू नये. नाही तर तुमचा हा निर्णय तुम्हाला संकटात टाकू शकतो.

Chanakya Niti : या ठिकाणी घर बांधण्याची करूच नका चूक, नाही मिळणार सुख, चाणक्यने दिलाय तो धोक्याचा इशारा
येथे नका बांधू इमला
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 25, 2025 | 4:29 PM

घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट उपसतात. आयुष्यभराची जपून ठेवलेली कमाई घरासाठी वापरतात. मानव हा समाजशील आहे. त्याला कुटुंबासोबत राहण्याची सवय आहे. घर बांधताना मात्र ही एक चूक तुमच्या कुटुंबासाठी घातक ठरू शकते. तुम्हाला, कुटुंबाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो. चाणक्य नीतीमध्ये या पाच ठिकाणी घर बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. कारण या जागांवर घर बांधणे म्हणजे नरकात राहण्यासारखे असते असे आचार्य चाणक्य यांचे म्हणणे आहे.

या जागी तुमचे घर नको, काय सांगते चाणक्य नीती

1- चाणक्य नीतीनुसार, ज्या जागांवर, ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ वाटते. नकारात्मकता जाणवते. भीती वाटते अशा ठिकाणी घर बांधू नका. अशी जमीन खरेदी करणे सुद्धा टाळा. चाणक्य नीतीनुसार, असा सौदा तुम्हाला पुढे महागात पडू शकतो. अशी वास्तू फलदायी नसते.

2- जिथे गुंड, बदमाश आणि व्यसनाधीन समाज अधिक असतो, अशा परिसरात सुद्धा घर बांधणे चांगले नसते. येथे गुन्हेगारी आणि त्यांचे राज्य असते अशा ठिकाणी घर घेणे म्हणजे कुटुंबाला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. तुम्हाला आणि कुटुंबाला सतत काळजीत राहावे लागेल.

3- चाणक्य नीतीनुसार, ज्या परिसरात सामाजिक बंधनांचा विसर असतो. जिथे कोणतेही, कुठल्याही प्रकारची बंधनं पाळली जात नाहीत, अशा ठिकाणी घर बांधू नका. कारण अशा परिसरात स्वैराचार असल्याने व्यक्तीला सन्मान मिळत नाही.

4- ज्या भागात शेजारधर्म पाळल्या जात नाही. संकटात जिथे कोणी धावून येत नाही, अशा ठिकाणी घर बांधू नका. अशा परिसरात किरायाचे घर घेऊन सुद्धा राहू नका. त्याचा फटका बसू शकतो.

5- जिथे व्यापार उद्यीम होत नसेल. प्रगतीची कोणतीही चिन्ह नसतील. नोकरी, पैशाची शाश्वती नसेल अशा ठिकाणी घर बांधणे तुमची चूक ठरू शकते. जीवनासाठी आवश्यक साधणे नसतील तर तिथे तुमचा कुटुंब कबिला हलवू नका.

6- एकदमच एकाकी, भयावह ठिकाणी घर बांधण्याचा फंदात पडू नका. जिथे नकारात्मक ऊर्जेची जाणीव होत असेल. तुमच्या घरातील लोकांना जिथे अस्वस्थ वाटत असेल. तिथे घर खरेदीचा प्रस्ताव तात्काळ रद्द करा.

डिस्क्लेमर : ही धार्मिक ग्रंथावरील माहिती आहे. यातील दाव्यांना टीव्ही 9 मराठी दुजोरा देत नाही. घर घेताना तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या.