AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga Prediction : जगात महामारी येणार, लोक लवकर म्हातारे होणार, बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणीने धोक्याची घंटा

A Big Epidemic : भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिने एक भयावह भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार, आता जगात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढेल. मानव जातीवर एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तरुणांची संख्या झपाट्याने कमी होईल. काय आहे ते भाकीत?

Baba Vanga Prediction : जगात महामारी येणार, लोक लवकर म्हातारे होणार, बाबा वेंगाच्या त्या भविष्यवाणीने धोक्याची घंटा
जग लवकर म्हातारे होणारImage Credit source: गुगल
| Updated on: Jun 25, 2025 | 3:39 PM
Share

प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिच्या एका भाकि‍ताने सध्या जगाची झोप उडाली आहे. जगाने कोरोनासारखी आपत्ती झेलली आहे. आता जगासमोर नवीन संकट उभं ठाकणार आहे. जगात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढण्याची भीती आहे. मानव जातीवर एका आजाराची छाया पडणार आहे. त्यामुळे तरुणांची संख्या झपाट्याने कमी होण्याची भीती या भविष्यवाणीतून वर्तवण्यात आली आहे. बाबा वेंगा हिचा 1996 मध्ये मृत्यू झाला होता. तिची अनेक भाकीत खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. आता ही तिच्या या भाकि‍ताने जगाला घाम फोडला आहे. तिच्या मते हा एक खतरनाक व्हायरस आहे. त्याचा आघात मानव जातीवर होईल आणि लोक झपाट्याने म्हातारे होतील.

कधी येणार तो व्हायरस?

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, येत्या काही वर्षात हा भयावह व्हायरस दाखल होईल. त्यात मानवाचे वय झपाट्याने वाढेल. लोक काही वर्षातच म्हातारे होतील. बाबा वेंगा हिच्या मते 2084 मध्ये मोठे नैसर्गिक बदल होतील. निसर्गाचे हे बदल मानव जातीसाठी घातक ठरतील. 2088 मध्ये एक व्हायरस येईल. त्यामुळे लोक झटपट म्हातारे होतील. कमी वयातच त्यांना अनेक रोग होतील. 2097 पर्यंत या आजारामुळे जगातील अनेक लोक म्हातारे होतील. पण नंतर हा आजार गायब होईल.

2111 पर्यंत जगभरात मानवाप्रमाणे काम करणारे आणि दिसणारे रोबोट तयार करण्यास सुरूवात होईल. हिंदू धार्मिक ग्रंथात सुद्धा कलयुगात मानवाचे आयुष्यमान कमी होण्याचे भाकीत केलेले आहे. विष्णू पुराणानुसार, कलियुग जस जसे पुढे जाईल. मानवाचे आयुष्य कमी होईल. मानवाचे आयुष्य आदमासे 20 वर्षे असेल. कमी वयातच मुलांचे केस पांढरे होतील. त्यांचे कमी वयातच लग्न होईल. मुलं 9-10 वर्षांचे असताना आणि मुली 6-7 वर्षाची असतानाच त्यांचे लग्न होतील आणि त्यांना अपत्य प्राप्ती होईल. विष्णू पुराणानुसार या काळात लोक शरीरावर अशी काही चिन्ह गोंदवतील की त्यावरून त्यांचे वय इंगित होईल कलियुगात मानवाचे डोळे बारीक होतील. त्यांची दृष्टी पण लवकर अधु होईल. तर मानवाची उंची सुद्धा कमी होईल. त्याची उंची आतापेक्षा अर्ध्याच्या जवळपास येईल.

डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती आहे. शास्त्रज्ञांनी, हवामान तज्ज्ञांनी रिओच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. तिच्या पुस्तकात ही माहिती वर्तवण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी त्याला दुजोरा देत नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.