
आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, तसेच ते कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी कुटनीतीचा वापर करून धनानंदसारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. शत्रू सोबत कसं लढायचं? याबाबत चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात शत्रू लहान असो, मोठा असो, त्याला कधीही कमी समजण्याची चूक करू नये, तुम्ही जर तुमच्या शत्रूकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा घात झालाच म्हणून समजा. पुढे चाणक्य यांनी असंही म्हटलं आहे की, माणसाच्या आयुष्यात दोन प्रकारचे शत्रू असतात, एक गुप्त शत्रू तर दुसरे समोर दिसणारे शत्रू, जे गुप्त शत्रू असतात ते या उघड शत्रूंपेक्षा जास्त खरतनाक असतात असंही चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये म्हटलं आहे. शत्रूचा कसा परभाव करायचा? याबाबत चाणक्य काय म्हणतात? जाणून घेऊयात.
शत्रूची कमजोरी ओळखा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला शत्रूचा परभाव करायचा आहे, तेव्हा सगळ्यात आधी त्याची कमजोरी ओळखा, ज्या गोष्टीत तो कमी असेल किंवा त्याची शक्ती कमी असेल अशा गोष्टींवर सगळ्यात आधी प्रहार करा. त्यामुळे तुमच्या शत्रूचं खच्चीकर होईल.
बलस्थान ओळखा – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा शत्रूचा पराभव करायचा आहे, तेव्हा त्याचं बलस्थान काय आहे? ते ओळखा आणि त्याला धक्का देण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या शत्रूचं बलस्थान नष्ट झालं तर आपोआपच तुमचा शत्रू देखील नष्ट होईल.
योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा तुमच्या शत्रूवर हल्ल्याची योजना तयार करता, तेव्हा ती अतिशय गुप्त ठेवा. तुम्ही जर तुमची योजना एखाद्या व्यक्तीला सांगितली तर ती तु्मच्या शत्रूपर्यंत देखील पोहोचण्याची शक्यता असते, जर शत्रूला तुमची योजना कळाली तर तो वेळीच सावध होईल, अशा अवस्थेत तुम्ही त्याचा पराभव करू शकणार नाहीत.
भावनिक होऊ नका – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची लढाई लढत असतात, अशावेळी भावनिक होऊ नका, जर तुम्ही भावनिक झालात, तर त्यामुळे तुमचं नुकसान होईल.
अलर्ट मोडमध्ये रहा – चाणक्य म्हणतात ज्या माणसाला शत्रू आहेत, त्याने सतत अलर्ट मोडमध्ये राहिलं पाहिजे, कारण तुमचा शत्रू तुमच्यावर कधीही हल्ला करण्याचा शक्यता असते, अशा स्थितीमध्ये तुम्ही सतत सावध असलं पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)