AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की असे अनेक लोक असतात जे आपल्या आयुष्यात यशस्वी होतात, मात्र ते यश त्यांना पचवता येत नाही. असे लोक भविष्यात मोठ्या अडचणीत सापडतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : मोठं यश मिळालं तरी शांत राहा, चाणक्य यांनी सांगितले आयुष्यातील 4 कटू सत्य
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 29, 2026 | 8:08 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात यश अपयश सुरूच असतं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये मानसानं संयम सोडला नाही पाहिजे. त्याचप्रमाणे दोन्ही स्थितीमध्ये मानसाने शांत रहावं. जेव्हा कधी तुमच्या वाट्याला अपयश येतं तेव्हा, ते तुम्ही जगाला कधीच सांगू नका, यामुळे तुमचंच नुकसान होणार असतं. त्यामुळे तुम्हाला जर अपयश आलं असेल तर अशा स्थितीमध्ये शांत राहा, आपल्याला अपयश का आलं? त्याच्या कारणाचा शोध घ्या आणि पुन्हा कामाला लागा त्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात की एकवेळेस माणूस आपला पराभव झाल्यानंतर शांत बसू शकतो. मात्र जेव्हा त्याला यश मिळतं, तेव्हा तो कधीच शांत बसू शकत नाही. तो संपूर्ण जगाला आपलं यश ओरडून सांगतो, त्या यशाचा आनंद साजरा करातो. या जगात तर असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपलं यश पचवता येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की अशा लोकांचे समाजात खूप सारे शत्रू तयार होतात, त्यामुळे तुम्हाला जेव्हा यश मिळालं असेल, तेव्हा देखील तुम्ही शांत राहिलं पाहिजे, असं चाणक्य नीती म्हणते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शत्रू – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला यश मिळतं, आणि तुम्ही हे यश जगाला ओरडून सांगतात, तेव्हा आपोआपच तुमचा द्वेष करणारे लोक या समाजात तयार होतात, त्यामुळे आपलं यश हे एकांतात सेलिब्रेट करा, ते कोणालाही सांगू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

मत्सर – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा यश मिळतं, तेव्हा तुम्ही शांत बसलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा ही गोष्ट इतरांना सांगतात तेव्हा ते तुमचा मत्सर करू लागतात कारण त्यांना ती गोष्ट प्राप्त झालेली नसते. ते तुम्हाला मागं ओढण्याचा प्रयत्न करतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

नियंत्रण – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळतं, तेव्हा तुम्ही त्या यशाने हुरळून जातात, परिणामी तुमचं तुमच्या मनावर नियंत्रण राहत नाही, त्याचा फटका तुम्हाला नंतर तुमच्या कामात बसतो, त्यामुळे तुम्हाला जेव्हा यश मिळतं तेव्हा माणसानं शांत राहावं.

नियोजन – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीत यश मिळालं की त्यानंतर त्याचा जास्त उत्सव न करता, लगेच पुढच्या यशासाठी नियोजन करणं गरजेचं असतं, असा सल्ला चाणक्य यांनी दिलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन