
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी असे अनेक विचार मांडले आहेत, जे आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे जसे अर्थतज्ज्ञ होते, तसे ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यामुळे कोणासोबत कसा व्यवहार करावा? मित्रासोबत तुमचे संबंध कसे असावेत? राजाचा आपल्या प्रजेसोबत व्यवहार कसा असावा? तुमचा मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे? हे कसं ओळखावं असे एकना अनेक विचार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहेत.
दरम्यान चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये असा सल्ला देतात की जगात असे चार लोक असतात, ज्यांच्यासोबत तुम्ही कधीही शत्रूत्व घेऊ नका. अन्यथा तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते. तुमच्या आयुष्यातून सूख -शांती नष्ट होऊ शकते, ते चार लोक कोण आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं जाणून घेऊयात.
शेजाऱ्याना शत्रू बनवू नका – चाणक्य म्हणतात तुमचे जे शेजारी आहेत, त्यांच्यासोबत कायम मैत्रीचं नातं ठेवा, त्यांच्यासोबत कधीही शत्रूत्व घेऊ नका. कारण त्यांची तुम्हाला कधीही मदत लागू शकते. तसेच तुम्ही जर त्यांना शत्रू बनवलं तर तुमच्या दूरच्या शत्रू पेक्षा अधिक कट कारस्थान तुमच्याविरोधात तुमचा शेजारी करू शकतो. कारण त्याला पूर्वीपासूनच तुमच्या सर्व गोष्टी माहिती असतात.
नातेवाईकांना, भावाला शत्रू बनवू नका – चाणक्य म्हणतात चुकूनही तुमच्या नातेवाईकांना किंवा भावाला तुमचा शत्रू बनवू नका, लक्षात ठेवा तुमच्यावर जेव्हा वाईट प्रसंग येईल तेव्हा सर्वात आधी तेच तुमच्या मदतीला धावणार आहेत.
तुमच्या परिसरातील प्रतिष्ठित माणसाला शत्रू बनवू नका – चाणक्य म्हणतात तुमच्या परिसरामध्ये काही प्रतिष्ठित माणसं असतात, ज्यांचा समाजामध्ये मोठा मान असतो. अशा लोकांशी चांगलं वागा.
सत्ताधारी लोकांशी पंगा घेऊ नका – चाणक्य म्हणतात ज्यांच्या हातात सत्ता आहे, अशा लोकांना तुम्ही तुमचे शत्रू बनवले तर तुम्ही अडचणीत याल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)