Chanakya Niti : अनेक लोक याच कारणांमुळे होतात अपयशी, चाणक्य यांनी सांगितलं यशस्वी आयुष्याचं सूत्र

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? आणि काय टाळलं पाहिजे? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : अनेक लोक याच कारणांमुळे होतात अपयशी, चाणक्य यांनी सांगितलं यशस्वी आयुष्याचं सूत्र
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 10:02 PM

आर्य चाणक्य हे एक विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही कालबाह्य वाटत नाहीत. आपण आपल्या आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, मात्र प्रत्येकजणच यशस्वी होतो असं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे यशस्वीतेचे मापदंड हे वेगळे असतात. परंतु आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्या गोष्टी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या रोजच्या जीवनात अंमलात आणल्या तर असा व्यक्ती आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. माणसाने आपल्या आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी सांगतिलं आहे. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्याकडे सर्वात आधी कोणती गोष्ट पाहिजे, ती म्हणजे संयम, ज्या व्यक्तींकडे संयम असतो, ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते?

विश्वास – चाणक्य म्हणतात कोणावरही विश्वास ठेवताना विचारपूर्वकच ठेवा. कारण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्या व्यक्तीने जर तुम्हाला धोका दिला तर भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जर आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कोणावरही विश्वास ठेवताना जो विचारपूर्वकच ठेवा. समोरचा व्यक्ती कसा आहे? त्यावरून त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा? हे ठरवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कमी बोला – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कमीत कमी बोला आणि काम जास्त करा. जर तुम्हाला जास्त बोलण्याची सवय असेल तर अनेकदा तुम्ही आपल्या मनातील योजना देखील दुसऱ्या लोकांना सांगून टाकतात. अशावेळी तुमचे हित शत्रू तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता असते.

संगत – चाणक्य म्हणतात तुम्ही कोणत्या लोकांच्या संगतीमध्ये आहात, यावरून तुमचं भविष्य कसं असणार आहे? हे ठरतं. त्यामुळे मानसानं नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीमध्येच राहिलं पाहिजे. जर तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असाल तर आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

भावनांवर नियंत्रण ठेवा – चाणक्य म्हणतात माणसांना नेहमी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, अनेकदा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतात. त्यामुळे कधीही कोणाताही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. तुमचं जेवढं जास्त भावनांवर नियंत्रण तेवढे तुम्ही अधिक यशस्वी होऊ शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us