Chanakya Niti : या लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात, कराल पश्चाताप

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये म्हणतात की समाजात असे काही लोक असतात त्यांच्याशी मैत्री करणं तुम्हाला महागात पडू शकतं, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या लोकांशी मैत्री करणं पडू शकतं महागात, कराल पश्चाताप
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 05, 2026 | 10:51 AM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जर सर्वात सुंदर कोणतं नातं असेल तर ते नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात सापडतात, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमचे नातेवाईक मदत करतीलच याची काही खात्री नसते, परंतु एक खरा मित्र नेहमी कोणत्याही संकटाच्या काळात तुमच्या मदतीला धावून येतो. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात असा एक तरी मित्र हवाच. मात्र मैत्री करताना सावध असणं देखील गरजेचं आहे. आपण कोणासोबत मैत्री करतो आहोत, याचं भान आपल्याला पाहिजे, अन्यथा याच मैत्रीमुळे एक दिवस तुम्ही मोठ्या संकटात सापडता. जगात असे काही लोक असतात त्यांच्यासोबत कधीच मैत्री करता कामा नये, जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

व्यसनी लोक – चाणक्य म्हणतात व्यसनी लोकांपासून जेवढं लांब राहाता येईल तेवढं लांब राहिलं पाहिजे, कारण असे लोक हे तुमच्यासाठी धोकादायक असतात, जेव्हा तुम्ही अशा लोकांशी मैत्री करता तेव्हा कालंतराने तुम्हाला देखील व्यसनाची सवय लागते, तुम्ही देखील व्यसनी बनतात, त्यामुळे अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नये.

खोटं बोलणारे लोक – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना सतत खोटं बोलण्याची सवय असते, अशा लोकांसोबत कधीही मैत्री करू नये, कारण या लोकांमुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. लोकांचा तुमच्यावरील विश्वास देखील कमी होतो.

आपल्यापेक्षा श्रीमंत लोक – चाणक्य म्हणतात मैत्री ही नेहमी बोरोबरीच्या लोकांसोबतच करावी, आपल्या पेक्षा श्रीमंत माणसासोबत मैत्री करू नये, त्यामुळे आपला अपमान होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)