
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या त्याला प्रत्येक क्षणी हव्या वाटतात. तो त्या गोष्टींमध्ये इतका गुरफटून जातो की, त्यामुळे एक दिवस तो मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे माणसानं कधीच अशा गोष्टींचा जास्त मोह करू नये, जरी त्या गोष्टी आपल्यासाठी कितीही आवश्यक असल्या तरी अशा गोष्टींचा कधीही अंत नसतो, त्यामुळे आपण अशा गोष्टींच्या मागे लागून आपल्या आयुष्यातील सर्व सुख शांती गमावून बसतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यासाठी चाणक्य यांनी एक सोपं उदाहरण देखील दिलं आहे. चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाला पैसा धन हवं असतं, तुम्ही प्रत्येक गोष्ट धनानं विकत घेऊ शकतात. मात्र तुम्ही जेव्हा सर्व गोष्टी विसरून केवळ धन, पैसा कमावण्याच्या पाठीमागे लागतात, तेव्हा तुम्ही आपलं आयुष्य हरवून बसता. तुमच्या आयुष्यातून सुख शांती गायब होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
धनाचा मोह – चाणक्य म्हणतात माणसाला पैशांची गरज असते, परंतु माणसाच्या आयुष्यात पैसाच सर्व काही नसतो. त्यामुळे धनाचा आति मोह टाळला पाहिजे, तुम्ही जर सर्व गोष्टी सोडून फक्त धन कमावण्याच्या मागे लागतात. तर आयुष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमचं आरोग्य, सुख, शांती मित्र सर्व गमावून बसतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पद, प्रतिष्ठा – चाणक्य म्हणतात पद, प्रतिष्ठा ही अशी गोष्टी आहे, जी प्रत्येक माणसाला हवी असते, पद मिळवण्यासाठी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी माणसांची काहीही करण्याची तयारी असते, मात्र त्यामुळे एक दिवस माणूस मोठ्या संकटात सापडू शकतो. अनेकजण समाजात आपली खोटी प्रतिष्ठा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, मात्र असे लोक स्वत:च स्वत:ची फसवणूक करत असतात.
स्वार्थी नाती – चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशी अनेक नाती असतात, जी की फक्त आपल्या स्वार्थामुळे टिकून असतात, स्वार्थ संपल्यानंतर अशी लोक आपोआप दूर निघून जातात. परंतु अनेकदा असं होतं की आपल्याला कल्पना असते की हे नातं फक्त स्वार्थाच्या आधारावर टिकलेलं आहे, मात्र तरी देखील आपलं मन अशा नात्यामध्ये गुंतलं जातं, त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशारा चाणक्य यांनी दिला आहे.
भौतिक सुख – चाणक्य म्हणतात माणसांन कधीही भौतिक सुखाच्या जाळ्यात अडकू नये, कारण भौतिक सुखाचा कोणताही अंत नसतो. ते वाढतच जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)