Chanakya Niti : या लोकांना कधीच आपले शत्रू होऊ देऊ नका, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समजात असे काही लोक असतात, ज्यांच्यांशी तुम्ही कधीही शत्रूत्व घेऊ नका, कारण अशा लोकांमुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti : या लोकांना कधीच आपले शत्रू होऊ देऊ नका, चाणक्य काय म्हणतात?
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 8:40 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असेत, की आपलं आयुष्य हे सुखी असावं, कोणत्याही प्रकारचा त्रास, कलह आपल्या आयुष्यात नसावा. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे या जगात अशा काही व्यक्ती असतात, ज्या व्यक्तींशी तुम्ही कधीही पंगा घेऊ नका, त्यांच्याशी शत्रूत्व करू नका. अशा लोकांपासून तुम्ही कायम सावध राहिलं पाहिजे, अशा लोकांसोबत मैत्री देखील करू नका आणि त्यांना कधीही आपले शत्रू देखील होऊ देऊ नका. कारण अशा लोकांपासून तुम्हाला भविष्यात मोठा धोका होऊ शकतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात जे कपटी लोक असतात, तुम्ही त्यांच्यांशी मैत्री केली तरी देखील ते तुम्हाला धोका देणारच असतात. ते आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मात्र तुम्ही जर अशा लोकांसोबत शत्रूत्व घेतलं तर मग विचारूच नका. ते तुम्हाला हरवण्यासाठी कोणतीही पातळी गाठू शकतात, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

सत्ताधारी लोक – चाणक्य म्हणतात ज्यांच्या हातात सत्ता आहे, अशा लोकांशी तुम्ही कधीही शत्रूत्व घेऊ नका, कारण असे लोक आपल्या हातात असलेल्या सत्तेच्या जोरावर काहीही करु शकतात, अशा लोकांपासून तुम्हाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

स्वार्थी लोक – चाणक्य म्हणतात स्वार्थी लोकांसोबत मैत्रीही नसावी, आणि शत्रूत्व तर नसावच नसावं, अशा लोकांना कायम आपल्यापासू दूर ठेवावं. कारण असे लोक आपल्या स्वार्थासाठी तुम्हाला कधी धोका देतील हे सांगता येत नाही.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us