
आर्य चाणक्य हे एक महान विचारंवत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी पैशे, धन, संपत्ती याबद्दल आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. माणसाला संकट काळात फक्त त्याने बचत केलेला पैसाचा कामी येतो, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मात्र चाणक्य जसे अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी कुटनीती संदर्भात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपल्या आयुष्यात उपयोगी पडतात. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात त्यांना तुम्ही कधीच शत्रू बनवू नका, नाहीतर तुम्ही संकटात सापडाल. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
सत्ताधारी व्यक्ती – आर्य चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीकडे सत्ता असते, अशा व्यक्तीला तुम्ही कधीही तुमचा शत्रू बनवू नका. त्याच्यासोबत मैत्री करा. तुम्ही जर अशा व्यक्तीला आपला शत्रू बनवलं ज्याच्याकडे सत्ता आहे, तर तो सत्तेच्या जोरावर तुमच्यासमोर संकटांचा डोंगर उभा करू शकतो. तुमच्या अडचणी वाढू शकतात.
धनवान व्यक्ती – चाणक्य म्हणतात जगात पैसाच सर्व काही आहे, तुमच्या संकट काळात पैसा तुम्हाला तारून नेऊ शकतो. पैशांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर येऊ शकतात. तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, संकट काळासाठी पैशांची बचत करा, आणि तुम्ही श्रीमंत व्हा, दुसरा म्हणजे कधीही धनवान व्यक्तीला तुमचा शत्रू बनवू नका.
शक्तिशाली व्यक्ती – चाणक्य म्हणतात ज्याच्या अंगात बळ आहे, जो व्यक्ती तुमच्यापेक्षा बलवान आहे, अशा व्यक्तीला आपला शत्रू बनवू नका, कारण तो तुमच्याविरोधात त्याच्या बळाचा प्रयोग करू शकतो, त्यामुळे तुम्ही अडचणीत याल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)