Chanakya Niti : या पाच ठिकाणी कधीच बोलू नका, गप्प बसण्यातच शहाणपण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये संयमाचा सल्ला देतात. चाणक्य म्हणतात काही प्रसंग असे असतात तिथे गप्प बसण्यातच शहाणपण असतं, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नवाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य संयमाचं महत्त्व समजून सांगताना म्हणतात, ज्या व्यक्तीकडे संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. जो व्यक्ती उताविळ असतो, ज्याच्याकडे संयमाचा अभाव असतो, असा व्यक्ती एक न एक दिवस मोठ्या संकटात सापडतो. त्यामुळे माणसाने आपल्या जीभेवर ताबा ठेवला पाहिजे. समाजात अनेक लोक असे असतात ज्यांना नको तिथे बोलण्याची सवय असते, त्यामुळे त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येते. त्यांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे मानसाने बोलताना नेहमी काळ, वेळ तसेच आपण कोणाशी बोलत आहोत? काय बोलत आहोत, याचं भान ठेवलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात असे पाच प्रसंग येतात जिथे गप्प बसणंच शहाणपणा असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
राग – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला राग आलेला असेल तेव्हा तुम्ही गप्प बसणं हेच शहाणपणाचं असतं. कारण जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूवरील नियंत्रण पूर्णपणे गमावलेलं असतं. अशा स्थितीमध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीला काय बोलता? याचं भान तुम्हाला राहत नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन कायमचं दुखावलं जाऊ शकतं, त्यामुळे अशा स्थितीमध्ये शांत राहणं हे योग्य असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच समोरचा व्यक्ती जर रागात असेल तरी देखील शांत राहा असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.
जेव्हा समोरचा व्यक्ती ऐकण्याच्या स्थितीमध्ये नसतो- चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहात, मात्र तो तुमचं म्हणणं ऐकण्याच्या स्थितीमध्येच नाही, अशावेळी माणसाने गप्प बसावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दुसऱ्यावर टीका होत असताना – चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्ती तिसऱ्याच व्यक्तीबाबत तुमच्याशी वाईट बोलत आहे, त्याच्या चुका दाखवून देत आहे, अशा स्थितीमध्ये शांत राहा, काहीच बोलू नका.
ज्ञान अर्धवट आहे- चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल अर्धवट ज्ञान आहे, त्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही, आणि त्या गोष्टीबद्दल दोन तज्ज्ञ चर्चा करत आहोत, अशा वेळी गप्प बसण्यातच तुमचं हीत आहे.
अपमान झाला असताना – चाणक्य म्हणतात जर एखाद्या ठिकाणी तुमचा अपमान झाला तर त्याला लगेच उत्तर देऊ नका, तर थोडं थांबा शांत डोक्याने विचार करा आणि मग अपमानाला उत्तर द्या.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)