Chanakya Niti : या 3 लोकांना कधीच सांगू नका तुमचं गुपित, अन्यथा पश्चतापालाही मिळणार नाही वेळ
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. चाणक्य यांचे विचार आजच्या काळात देखील अनेकांना प्रेरणा देतात. आयुष्य जगत असताना काय करावं? आणि काय करू नये याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगीतलं आहे. आदर्श व्यक्तीची लक्षणं काय असतात? संसार कसा करावा? आपला मित्र कोण? शत्रू कोण? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
आर्य चाणक्य म्हणतात समाजात असे अनेक लोक असतात ज्यांना कधीही आपलं गुपित किंवा रहस्य सांगता कामा नये, अन्यथा तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येईल. आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? कोण आहेत असे लोक? ज्यांना तुमचं गुपित किंवा रहस्य न सांगण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
आर्य चाणक्य म्हणतात की तुम्ही जर एखादी योजना आखत असाल तर ती सुरुवातील कोणालाच सांगू नका, कारण ही योजना तुम्ही तुमच्या मित्राला जरी सांगितली आणि पुढे तुमच्यामध्ये काही कारणांमुळे मतभेद झाले, भांडण झाले तर अशावेळी तो तुमच्या या योजनेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे योजना पूर्णत्वास जाईपर्यंत कोणालाच सांगू नका असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य यांनी व्यक्तीची अशी काही लक्षणं सांगितली आहेत, त्या व्यक्तीला तुमच्या योजना सांगू नका असं चाणक्य म्हणतात.
स्वार्थी व्यक्ती – आर्य चाणक्य म्हणतात जे व्यक्ती स्वार्थी असतात, ते आपला स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्यामुळे तुमची योजना, गुपित अशा व्यक्तींना चुकूनही सांगू नका.
सर्वांचेच मित्र असलेले लोक – जो व्यक्ती सर्वांचाच मित्र असतो, तो व्यक्ती कोणाचाच मित्र नसतो, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अशा लोकांना तुमचं गुपित सांगू नका, असं चाणक्य म्हणतात.
तुमच्या भावनांची कदर न करणारे लोक – आर्य चाणक्य म्हणतात अशा लोकांनाही तुमचं गुपित कधीच सांगू नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
