AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : समस्या कितीही मोठी असू द्या, संकट काळात या गोष्टी करा, तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. संकट काळात माणसानं काय करावं आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : समस्या कितीही मोठी असू द्या, संकट काळात या गोष्टी करा, तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 7:33 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ -उतार सुरूच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतात. मात्र या संकटांना तुम्ही जर धैर्याने तोंड दिलं, तर ही संकट आली तशीच निघून जातात. मात्र संकटांमुळे तुम्ही जर खचलात, हिंमत हारलात तर मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकरणार नाहीत. त्यामुळे संकटांना कधीही घाबरून जाऊ नका. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही या जगात कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात जर समजा तुमचा पराभव झाला असेल, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवता आली नसेल, तर लगेच खचून जाऊ नका, त्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करा आपण नेमकं कुठे कमी पडलो ते लक्षात ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे?

शत्रूला कधीही कमी लेखू नका – चाणक्य म्हणतात तुमच्या यशामधील सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा शत्रू. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुमचा शत्रू कसाही असू द्या, छोटा-मोठा त्याला कमी लेखण्याची चूक करू नका. त्याच्यापासून नेहमी सावंध राहा. तो तुमचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार पण तुम्ही त्याच्या एक पाऊल पुढे राहा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

धैर्य आणि संयम – चाणक्य म्हणता संकट येतात, तशी ती जातात देखील. मात्र तुम्हाला तुमच्यावर आलेल्या संकटावेळी संयम ठेवता आला पाहिजे. जर तुम्ही या काळात आपला संयम गमावला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. मात्र जर तुम्ही तुमच्या संकट काळात संयम ठेवून येणाऱ्या संकटाचा धैर्याने सामना केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीही पराभूत करू शकत नाही.

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या काही योजना बनवतात त्या योजना गुप्त ठेवा, आपल्या भविष्यातील योजनांबद्दल कोणालाही माहिती देऊ नका, तर आणि तरच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा