
आर्य चाणक्य हे एक विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाच ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर तो म्हणजे पैसा, जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुमच्यासाठी या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते. त्यामुळे पैशांची बचत केली पाहिजे, पुढे ते असंही म्हणतात आपण पहातो की काही लोक खूप गरीब असतात, मात्र त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात यशाची एक -एक पायरी चढत जातात आणि श्रीमंत होतात. मात्र काही लोक हे गर्भश्रीमंत असतात, मात्र त्यांच्या उतार वयात हे लोक कंगाल होतात? याचं कारण म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यामुळे व्यक्तीने नेहमी आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
उधळपट्टी – चाणक्य म्हणतात ज्या लोकांना पैशांची किंमत कळत नाही, जे कारण नसताना देखील पैशांची उधळपट्टी करतात, चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करतात. ते कितीही श्रीमंत असले तरी कालांतराने गरीब होतात. त्यामुळे विनाकारण पैसा खर्च करू नये, पैशांची बचत करावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
दुसर्याचा अपमान – चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात की जे लोक कायम दुसऱ्या व्यक्तीला आपल्या पेक्षा कमी समजतात, त्यांचा अपमान करतात. त्यामुळे आपल्यापासून लोक दुरावे जातात, आपल्या संकट काळात कोणीही मदतीला येत नाही. त्यामुळे प्रत्येकाला योग्य तो मान -सन्मान द्या.
रागीट स्वभाव – चाणक्य म्हणतात काही लोक हे मुळातच रागीट स्वभावाचे असतात, अशा लोकांना व्यापार, नोकरीमध्ये त्यांच्या स्वभावाचा फार मोठा फटका बसतो. त्यामुळे राग नियंत्रणात ठेवावा. लक्षात ठेवा माणसाच्या जीभेवर नेहमी साखर असावी आणि डोक्यावर बर्फ
आळस – चाणक्य म्हणतात जे लोक आळशी असतात ते कितीही श्रीमंत असले तरी ते कालांतराने गरीब होतात, कारण असे लोक कोणतंही काम न करता आपल्याजवळ असलेले पैसे खर्चत राहतात.
वेळीची किंमत – चाणक्य म्हणतात ज्याला वेळीची किंमत कळाली तोच माणूस जगात यशस्वी ठरतो, त्यामुळे वेळेचा आदर करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)