AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : घरात कधीच होणार नाहीत भांडणं; येईल सुख, समृद्धी, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्यांनी संसार कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : घरात कधीच होणार नाहीत भांडणं; येईल सुख, समृद्धी, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
CHANAKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 10:05 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये पती-पत्नीची कर्तव्य काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? घरातील कुटुंब प्रमुखाने इतर सदस्यांसोबत कसं वागावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीला रथाच्या दोन चाकांची उपमा दिली जाते, जोपर्यंत रथाची दोन्ही चाके समान गतीने धावत आहेत, तोपर्यंत तो रथ व्यवस्थित चालतो, मात्र त्यातील एक चाक मागे किंवा पुढे झालं तर तो रथ धावणार नाही, तसंच संसाराचं देखील आहे. जोपर्यंत पती-पत्नीचा एकमेकांवर विश्वास आहे, एकमेकांना खंबीर साथ आहे, तोपर्यंत संसार सुरळीत सुरू राहणार, परंतु जर नात्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास नसेल तर असा संसार फार काळ टिकू शकत नाही, अशा घरात नेहमी सतत कलह होत राहतो, ज्याचा परिणाम हा त्या घरातील इतर सदस्यांवर आणि मुलांवर देखील होतो, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे, तसेच गृहकलह टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कुटुंब प्रमुखाची जबाबदारी – चाणक्य म्हणतात घरातील कुटुंब प्रमुख म्हणून व्यक्तीवर फार मोठी जबाबदारी असते. घरातील कुटुंब प्रमुख या नात्याने असा व्यक्ती त्याची पत्नी आणि घरातील इतर सदस्य यांना जोडणारा पूल असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा पूल ढासळता कामा नये. जर हा पूल ढासळला तर मात्र घरात सतत भांडणं होत राहातील, परंतु हा पूल जर मजबूत असेल तर मात्र घरात कधीही भांडणं होणार नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कुटुंबातील लोकांच्या गरजा – चाणक्य म्हणतात कुटुंब प्रमुख या नात्याने घरातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुखावर असते, घरातील सदस्यांना त्यांना हवे ते जर मिळाले, त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या तर असं कुटुंब कायम आनंदी राहतं, घरात सुख समृद्धी येते. घरातील इतर सदस्यांच्या मनात कुटुंबप्रमुखाबद्दल आदर वाढतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पैसे – चाणक्य म्हणता कुटुंबप्रमुखाने किमान एवढा तरी पैसा कमावला पाहिजे, ज्यामधून आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होतील, जर कुटुंब सुखी असेल तर अशा घरामध्ये कधीही वाद होत नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार!
Laxman Hake | हैदराबादचं गॅझेट नाही, बाबासाहेबांचं संविधान चालणार! लक्ष्मण हाकेंनी GR जाळून सरकारला सुनावलं
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे
ठाकरेंचे नगरसेवक आमच्या संपर्कात... एकीकडे कोर्टात सुनावणी दुसरीकडे पुन्हा ठाकरे गटाला खिंडार पडणार? भाजपा नेत्याचा दावा काय?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
Asim Sarode | शिवसेना पक्ष-चिन्हाचा निकाल कधी? असीम सरोदे यांचं भाकीत काय?
भुजबळांसह 3 मंत्र्यांचा ओबीसी उपसमितीच्या बैठकीतून बहिष्कार
OBC Reservation | ओबीसी उपसमितीच्या बैठकीत मोठा राडा! भुजबळांसह 3 मंत्र्यांचा बैठकीतून बहिष्कार; निधीवरून सरकारला घेरलं
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
शिवसेना कुणाची? आज शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार; थेट...
महागाईचा भडका कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुळेंनी सरकारला घेरलं
Supriya Sule | सण तोंडावर, महागाईचा भडका! कष्टकऱ्यांचं कंबरडं मोडलं; सुप्रिया सुळेंनी सरकारला घेरलं
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं...
ठाकरे गटाची बाजू... शिवसेना सुनावणी आधीच मोठा धमाका? बड्या वकिलाचं विधान चर्चेत
पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा...
Pune Ganeshotsav 2026 | पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ वरून वाद पेटला! डीजे बंद करा, अन्यथा मोठं आंदोलन उभारू
CSMT बाहेर महागाईविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक
CSMT स्थानकाबाहेर महागाईविरोधात सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी नेत्यांचे आंदोलन
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?