Chanakya Niti : या चार गोष्टींना घाबरणाऱ्या लोकांना आयुष्यात कधीच मिळत नाही यश, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की काही गोष्टी या अशा असतात, ज्यांना घाबरून चालत नाही. तुम्ही जर या गोष्टींना घाबरत असाल तर तुम्ही तु्मच्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक नीती सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना माणसाने आयुष्य कसं जगावं ते शिकवतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात चढ -उतार हे सुरूच असतात. कधी सुख येतं तर कधी दु:खाचे प्रसंग असतात. माणसाने या दोन्ही परिस्थिती अतिशय संयमाने हाताळायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. वेळ ही निघून जाणार आहे, जर तुम्ही दु:खात असाल तर कधी न कधी तुमच्या आयुष्यात सुख हे येणारच आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी येतात, प्रसंग येतात, अशा गोष्टींना घाबरून चालत नाही. तुम्ही जर या गोष्टींना घाबरलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते आणि या कोणत्या गोष्टी आहेत? त्याबद्दल.
कष्ट – चाणक्य म्हणतात आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. तुम्हाला प्रगती करायची आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे? मग तुम्हाला कष्ट हे केलेच पाहिजेत. तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल, तेवढं जास्त यश तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कष्टच केले नाही, तर तुम्हाला कोणीही एखादी गोष्ट आयती आणून देणार नाही. त्यामुळे आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जो व्यक्ती आपल्या आयुष्यात कष्टाला घाबरतो, आळशी आहे, असा व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही. मात्र जो कष्ट करतो, त्याला यश मिळाल्याशिवाय राहत नाही.
बदल – चाणक्य म्हणतात बदल हा या समाजाचा स्थायी स्वभाव आहे. सगळ्याच ठिकाणी बदल हे होतच असतात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही गोष्टी घडल्या आणि त्यामुळे जर काही बदल झाला तर त्याला घाबरू नका, तो बदल स्वीकारा, त्यानुसार तुम्ही स्वत:ला तयार करा, तर आणि तरच तुम्हाला यश मिळू शकतं.
संघर्ष – चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, तुमचा संघर्ष जेवढा जास्त तेवढं तुमचं यश जास्त, जे लोक संघर्षातून यश मिळवतात, अशा लोकांचा हा समाज कायमच आदर करतो, त्यांना मान-सन्मान देतो, त्यामुळे आयुष्यात कधीही संघर्षाला घाबरू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
निंदा – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्हाला यश मिळू लागतं, तेव्हा लोक तुमची निंदा ही करतातच, परंतु अशा निंदेला कधीही घाबरू नका, तरच तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)