
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक विषयांवर चर्चा केली आहे. चाणक्य यांनी मदत कोणाला करावी आणि कोणाला करू नये, याबाबत देखील चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात काही लोक असे असतात ज्यांना जर आपण मदत केली तर आपल्यावरच पश्चातापाची वेळ येते, त्यामुळे अशा लोकांना चुकूनही मदत करू नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
परिस्थिती पाहून मदत करा – चाणक्य म्हणतात एखाद्याला मदत करणं ही फार चांगली गोष्ट आहे, मदत केलीच पाहिजे, परंतु एखाद्या व्यक्तीला मदत करण्यापूर्वी परिस्थिती लक्षात घ्या, म्हणजे तुम्हीच एखाद्या फार मोठ्या संकटात आहात आणि तरी देखील तुम्ही दुसऱ्याची मदत करत आहात, तर अशा परिस्थितीमध्ये थोडा विचार करा, आधी तुमच्यावर आलेलं संकट दूर करा आणि मग समोरच्या व्यक्तीला मदत करा, अन्यथा तुम्ही दोघेही अडचणीत याला.
भावनिक होऊन मदत करू नका – चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीला मदत करताना चुकूनही भावनिक होऊन मदत करू नका, कारण भावनेच्या भरात अनेकदा आपण चुकीच्या माणसाला मदत करतो, पुढे चालून त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते.
जो नेहमी मदत मागतो त्याच्यापासून सावधान – चाणक्य म्हणतात जो तुम्हाला वारंवार मदत मागतो, त्याच्यापासून वेळीच सावध व्हा, कारण अशा व्यक्तीमुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं, असा व्यक्ती तुम्ही कितीही त्याला मदत केली तरी तो तुमच्याकडे मदत मागतच राहील.
स्वत:ची कुवत तपासा – चाणक्य म्हणतात आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर मदत करू नका, तसं केल्यास तुम्हीच अडचणीत याला, तुम्हाला जेवढी शक्य आहे, तेवढी मदत समोरच्या व्यक्तीला करा, मात्र कोणालाही कर्ज काढून मदत करू नका, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं , असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)