Chanakya Niti : चाणक्यांचा या पाच गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात कोणीच तुमचा पराभव करू शकणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत तसेच कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आयुष्यात जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर काय करावं लागेल, कोणते गुण तुमच्याकडे पाहिजे? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : चाणक्यांचा या पाच गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात कोणीच तुमचा पराभव करू शकणार नाही
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 11, 2026 | 7:11 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांना त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आले त्याचं सार त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे. चाणक्य यांनी आपल्या कुटनीतीच्या जोरावर धनानंद सारख्या बलाढ्य राजाचा पराभव केला आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य म्हणतात या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, असा पक्का निर्धार करतात, तेव्हा ती मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. असे काही गुण असतात हे गुण जर तुमच्यात असतील तर जगातील कोणताही व्यक्ती तुमचा पराभव करू शकणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

दृढ निश्चय – चाणक्य म्हणतात या जगात असे अनेक लोक असतात, ते आज ठरवतात की आपल्याला हे काम करायचं आहे. मात्र त्यानंतर काही वेळातच ते आपला प्लॅन बदलतात किंवा कंटाळाला करतात. असे लोक आज जे काम करायचं असतं ते उद्यावर ढकलतात, असे लोक आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मनाशी निश्चय करा, आणि आजपासूनच कामाला सुरुवात करा, तुम्हाला नक्की यश मिळणार.

संयम – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू असतो तेव्हा तुमच्या संयमाची कसोटी लागते, अशा काळात तुम्ही जर संयम ठेवला आणि जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू होताच अधिक जिद्दीने कामाला लागलात तर आयुष्यात यश मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकणार नाही.

कष्ट – चाणक्य म्हणतात आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय या जगात तुम्हाला फुकट कोणतीही गोष्ट मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर आळस झटकून टाका आणि प्रचंड कष्ट करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

शिक्षण – चाणक्य म्हणतात जे लोक अशिक्षित असतात अशा लोकांची त्यांच्या आयुष्यात कोणीही सहज फसवणूक करू शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त ज्ञान मिळवा, ज्ञान ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला यशाच्या पायरीपर्यंत घेऊन जाते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

दिशा – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला विजयी व्हायचं असेल तर तुम्ही प्रयत्न कोणत्या दिशेनं करतात हे महत्त्वाचं असतं, जर दिशा चुकली तर तुम्ही कितीही प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळू शकत नाही. मात्र तुम्ही जर योग्य दिशेनं प्रयत्न केलं तर तुम्हाला यश नक्की मिळणार.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us