Chanakya Niti : या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्याचं वाटोळं करतात, चाणक्यांनी दिला दूर राहण्याचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात या जगात अशा काही गोष्टी आहेत, त्यांच्यापासून माणसाने नेहमी दूर राहावं, अन्यथा या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्याचं वाटोळं होऊ शकतं, पश्चातापालाही वेळ मिळत नाही.

Chanakya Niti : या तीन गोष्टी माणसाच्या आयुष्याचं वाटोळं करतात, चाणक्यांनी दिला दूर राहण्याचा सल्ला
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 10:14 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील तितक्याच उपयोगी सिद्ध होतात. आर्य चाणक्य हे आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात जगात अशा काही गोष्टी असतात, ज्या गोष्टींपासून माणसाने कोसो दूर राहिलं पाहिजे, अशा गोष्टींपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. या गोष्टींचा माणसांना चटकन मोह होतो. क्षणिक जरी फायदा वाटत असला तरी देखील त्याचे दूरगामी परिणाम हे महाभयंकर असतात. तुम्ही या गोष्टींमध्ये गुंततच जातात, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. अशा गोष्टींमुळे तुमचं फार मोठं नुकसान होतं, त्यामुळे कोणतीही गोष्ट ही विचारपूर्वकच केली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

खर्च – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी खर्चाचा ताळेबंद ठेवला पाहिजे. तुमचं जेवढं उत्पन्न आहे, त्याच्या फक्त 75 टक्के रक्कमच खर्च केली पाहिजे, समजा जर तुमचं उत्पन्न शंभर रुपये असेल तर तुम्ही त्यातले 75 रुपयेच खर्च केले पाहिजे. 25 टक्के रकमेची बचत केली पाहिजे. परंतु अनेक लोकांना अशी सवय असते की ते त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात, त्यामुळे असे लोक अडचणीत येतात. त्यामुळे अति खर्चाचा मोह टाळला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Loading...

कर्ज – चाणक्य म्हणतात अनेक लोक काहीही गरज नसताना उगचच कर्ज घेतात. माणूस एकदा का कर्जाच्या दृष्ट चक्रात गुंतत गेला तर तो आयुष्यभरासाठी बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे माणसाने कर्ज कधीही घेतलं नाही पाहिजे. अगदीच गरज असेल तरच कर्ज घ्यावं. तसेच आपण ते कर्ज फेडू शकतो का? याचा देखील विचार करावा. आपण जेवढं कर्ज फेडू शकतो तेवढंच कर्ज घ्यावं, अन्यथा तुम्ही अडचणीत सापडू शकता.

शत्रूत्व – चाणक्य म्हणतात आयुष्यात चुकूनही कोणाशी शत्रूत्व करू नये, जेवढे तुमचे शत्रू कमी तेवढं जास्त यश तुम्हाला मिळण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रत्येकाला मित्र बनवलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us