Chanakya Niti | ‘या’ गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार

| Updated on: Apr 05, 2021 | 8:09 AM

चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही (Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya).

Chanakya Niti | या गोष्टी करण्यापासून एखाद्या व्यक्तीने कधीही लाजू नये, अन्यथा नुकसान होणार
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य यांच्या नीतींबाबत आपण आतापर्यंत अनेक गोष्टी जाणून (Chanakya Niti) घेतल्या आहेत. पण, अनेकजण त्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. चाणक्य यांनी आपल्या नीतींच्या आधारेच एक मुलाला सम्राट बनवलं होतं, ज्यांना चंद्रगुप्त मौर्य या नावाने ओळखलं जातं. चाणक्य यांनी जीवनासंबंधी ज्या गोष्टी त्यांच्या नीतीमध्ये सांगण्यात आल्या आहेत त्यांचं आयुष्यात अनुसरण केलं जात नाही (Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya).

जेव्हाकी आचार्य चाणक्य यांच्या नीतींच्या आधारे अनेक राजा-महाराजांनी यशस्वीरित्या शासन चालवलं. त्यांनी आपल्या नीतींमध्ये हे सांगितलं की जर कुठली व्यक्ती काही करताना संकोच करत असेल किंवा लाजत असेल तर तो आयुष्यात कधीही सुखी राहू शकत नाही. त्यासोबतच तो आपल्या भविष्यालाही धोक्यात टाकतो.

लजल्याने तुमचं नुकसान होणार

धनधान्यप्रयोगेषु विद्यासङ्ग्रहणेषु च ।
आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत।।

पैशाशी संबंधित बाबतीत लाजू नका

या श्लोकाद्वारे असे म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला पैशासंबंधित कामं करण्यास कधीही लाजू नये. जर असे झाले तर यामुळे आपल्या पैशाचे नुकसान होऊ शकते. म्हणून हे कधीही करू नका.

ज्ञान घेण्यास लाज वाटून घेऊ नका

आचार्य चाणक्य म्हणाले की, ज्ञान घेण्यास कधीही लाजू नये. जर आपण ज्ञान घेतले तर आपण आपले भविष्य मजबूत करु शकतो. आपल्याला आपल्या शिक्षकांच्या काही गोष्टी किंवा प्रश्न समजत नसल्यास संकोच न करता त्याबाबत विचारावे, यासाठी उशिर करु नये.

खाण्या-पिण्यात कधाीही लाजू नये

खाण्या-पिण्यात कधाीही लाजू नये. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि लाजेमुळे तुम्ही जेवत नसाल तर असं करु नका, कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.

कामापासून कधीही लाजू नये

चाणक्य या श्लोकात सांगतात की, काम-धंधा करताना कधीही लाजू नये. तुम्ही जे देखील काम करत असात आणि त्यामध्ये तुम्हाला काही कळत नसेल, तुम्ही कुठे अडकला असाल तर तुम्ही इतरांना त्याविशयी विचारु शकता, त्यामध्ये संकोच करायला नको. जर तुम्ही असं करणार नाही तर याने तुमचं नुकसान होऊ शकतं.

Chanakya Niti Things You Should Not Feel Shame To Do Said By Acharya Chanakya

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | खरी आणि चांगली व्यक्ती कशी ओळखावी? आचार्य चाणक्य काय सांगतात?

Chanakya Niti | विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ 7 मंत्र नेहमी लक्षात ठेवा…